‘तो’ पर्यंत बीडमध्ये फेटा बांधणार नाही, खा. अमोल कोल्हे यांचा निर्धार

बीड : पोलिसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीने सुरु केलेली शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्यात येऊन पोहचली यावेळी राष्ट्रवादीच्या मंचावरून अनेक नेत्यांनी आपली मते मांडली मात्र खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या विधामुळे बीडमध्ये एकच चर्चा रंगली आहे.

जोपर्यंत बीडमधील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नाही तोपर्यंत बीडमध्ये आल्यावर मी फेटा बांधणार नाही असा निर्धार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. शिवस्वराज्य यात्रा परळीहून आंबाजोगाईला आली तेव्हा नमिता मुंदडा यांनी कोल्हे यांना फेटा बांधण्यासाठी घेतला, मात्र कोल्हे यांनी फेटा बांधण्यास नकार दिला.

केजमधून नमिता मुंदडा आणि परळीमधून धनंजय मुंडे जोपर्यंत आमदार होणार नाहीत तोपर्यंत फेटा घालणार नाही असे अमोल कोल्हे यावेळी म्हणाले. केजमधून भाजपच्या संगीता ठोंबरे आमदार आहेत तर परळीमधून महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे या आमदार आहेत. २०१४ साली झालेल्या विधासभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा तर संगीता ठोंबरे यांनी नमिता मुंदडा यांचा पराभव केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like