Amol Kolhe on Raj Thackeray | ‘राज ठाकरेंना चुकीची माहिती पुरवण्यात आली’; लोकमान्य टिळकांनी जमवलेल्या निधीबाबत कोल्हेंनी केला उलगडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Kolhe on Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या (Aurangabad) सभेमध्ये बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधी लोकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) बांधली, असं वक्तव्य केलं होतं.
यावरून आता राज ठाकरेंचं वक्तव्य हे चुकीचं असल्याचं बोललं जात आहे.
लोकमान्य टिळकांनी महाराजांची समाधी बांधली हे पुर्णपणे चुकीचं असं संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) म्हणाले.
अशातच यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकासाठी आराध्य दैवत आहेत. मात्र त्यांच्या समाधीविषयी राज ठाकरे जे बोलले त्यावरून त्यांना चुकीची माहिती पुरवण्यात आल्याचं दिसतंय.
याबाबत अनेक इतिहास संशोधकांनी (History Researcher) पुरावे समोर आणले असल्याचं कोल्हे म्हणाले.

महाराजांची समाधी ही सर्वप्रथम महात्मा ज्योतीराव फुले (Mahatma Jyotirao Phule) यांंनी शोधली.
त्यांनी महाराजांवर पोवाडा लिहिला आणि शिवजयंती (Shiva Jayanti) त्यांनीच सुरू केली.
त्यानंतर महाराजांच्या जीर्णोद्धाराचा विचार पुढे आला. त्यावेळेस महाराज हे रयतेचे राजे असल्यामुळे त्यांच्या समाधीसाठी रयतेने पैसा उभा करावा, असा मुद्दा टिळकांनी मांडला.
त्याप्रमाणे निधी उभारण्यात आला मात्र तत्कालिन डेक्कन बँक (Deccan Bank) दिवाळखोरीत निघाली आणि जमा झालेले 80 हजार रूपयेही बुडाले असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं.

 

दरम्यान, 1920 साली टिळक यांचं निधन झालं आणि 1927 साली ब्रिटिशांनी महाराजांची समाधी बांधण्यासाठी पुढाकार घेतला.
इतिहास शुध्द तर्काच्या आधारे मांडायचा असतो. तो मांडताना द्वेष निर्माण होऊ नये तथा धार्मिक भावना भडकता कामा नये,
असंही कोल्हे म्हणाले.

 

Web Title :- Amol Kolhe on Raj Thackeray | NCP leader and mp amol kolhe slams raj thackeray over his comment on sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा