Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | आढळरावांना अमोल कोल्हेंचा टोला, ”असे भावनिक आवाहन करत असतील तर अर्ज भरण्यापूर्वीच ते पराभूत झालेत”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | स्वतःचे मनोधैर्य वाढवण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील दररोज एक मनोरंजक विधान करत आहेत. आढळराव पाटलांनी मी पणा सोडून कधीतरी देशाचा विचार करायला हवा. मतदारांना अशा प्रकारे भावनिक आवाहन करत असतील तर याचा अर्थ उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच ते पराभूत झाले आहेत असा होतो, अशी टीका शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार अमोल कोल्हे यांनी केली आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पत्रकारांशी बोलत होते. (Shirur Lok Sabha)

अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील तळवडे भागात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी त्यांनी विरोधी उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.(Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil)

ही लोकसभा निवडणूक माझी शेवटची आहे, असे भावनिक आवाहन आढळरावांनी मतदारांना केले होते. यावरून कोल्हे यांनी टीका केली. तुमची शेवटची निवडणूक आहे, म्हणून महागाई, बेरोजगारीवर काही फरक पडणार आहे का, अशी देखील खिल्ली कालपरवा कोल्हे यांनी उडवली होती. आता पुन्हा एकदा कोल्हे यांनी आढळरावांवर निशाणा साधला आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, शिवाजी आढळराव पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षात एकही मोठा प्रोजेक्ट शिरूर लोकसभा मतदारसंघात
आणलेला नाही. दरम्यान, अमोल कोल्हे यांना आढळराव पाटील कोणते उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘पूर्वी आम्ही घास घास घासायचो, इकडे आलो तर…’, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

Amol Kolhe On Ajit Pawar | 23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला चारच जागा मिळतात ही शोकांतिका – डॉ. अमोल कोल्हे (Video)

Minor Girl Rape Case Pune | पुणे : मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार