भाजप वाघासमोर तुकडा टाकून म्हणतंय ‘यायचंय तर या’ ; अमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा किल्ले रायगडावर आज समारोप झाला. रायगडावर छत्रपतींच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर महाजनादेश यात्रा महाडमध्ये पोहोचली. यावेळी अमोल कोल्हेंनी शिवसेनेवर कडाडून टीका केली.

भाजप-शिवसेनेच्या युतीविषयी बोलताना कोल्हे यांनी नरेंद्र मोदींच्या नाशिकमधील भाषणाचा संदर्भ देत शिवसेनेला लाचार म्हणत टीकेची झोड उठवली. मोदी यांनी नाशिकमध्ये महाराष्ट्रात स्थिर सरकार नसल्याने कामे होत नसल्याचे म्हणत शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्याचा धागा पकडत भाजपला युतीमध्ये किंमतच उरली नसल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हे म्हणाले, मोदींच्या भाषणानंतर युतीचे नेमके काय होणार याची चर्चा सुरु झाली असून शिवसेनेचा वाघ १४४ जागांची डरकाळी फोडतोय आणि भाजप मात्र वाघाला दाराच्या बाहेर ठेऊन त्याची जागा दाखवत आम्ही देतोय तेवढा तुकडा घ्यायचाय तर घ्या आणि यायचे असेल तर या. ही दुर्दैवाने महाराष्ट्राची परिस्थिती झाली असल्याचे त्यांनी सांगिलते.

भाजप टीव्हीवरून मोठ्या प्रमाणावर जाहिराती करत असून यातील अनेक जाहिराती बनावट आहेत. न केलेली कामे दाखवण्यासाठी लोकांचा पैसा सरकारकडून वापरला जातोय अशी टीकाही काल अमोल कोल्हे यांनी काल झालेल्या सभेत केली होती.

Visit :- policenama.com

You might also like