अभिनेता आणि खासदार डॉ. अमोल कोल्हेंकडून दीपिकाची ‘पाठराखण’, म्हणाले…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – दीपिका पादुकोणनं जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच भाजपाकडून तिच्यावर टीका सुरू झाली. राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी दीपिकाची पाठराखण करत ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दीपिका पादुकोणने JNU च्या विद्यार्थांची भेट घेतली. त्यामुळे तिच्या छापाक चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला.

यावर खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, एखाद्या सरकारच्या नीतीविरोधात एखादा कलाकार बोलतो तेव्हा त्याच्या विचारांचा सन्मान झाला पाहिजे, अमरावती इथं शिवपुत्र संभाजी महानाट्यची पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. तसंच, दीपिका पदुकोण यांनी जी भूमिका घेतली ती व्यक्ती म्हणून की कलाकार म्हणून एवढी सुद्धा सजगता आपल्यात नसेल तर येथून पुढे कोणताही कलाकार बोलण्यास तयार होणार नाही, अशी संतप्त भावनाही कोल्हे यांनी व्यक्त केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/