Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार, काळ्या दगडावरची रेष – डॉ. अमोल कोल्हे

मोशी : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe | पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या (Pimpri Chinchwad Congress) कार्यकर्त्यांची नुकतीच मोशी (Moshi) येथे बैठक पार पडली या बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (Shirur Lok Sabha)

देशामध्ये सर्वाधिक जागा काँगेस लढत आहे, देशातील वारं बदललं आहे. भाजप सरकारने महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दैना करून ठेवल्यामुळे देशातील जनता भाजपच्या सरकारवर नाराज आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे वारे वाहू लागले आहे. केंद्रातील मोदी सरकार जाऊन नवीन सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. असं म्हणत डॉ. कोल्हे यांनी केंद्रातील सरकार बदलणार असल्याचे सूतोवाच केले आहे.(Amol Kolhe)

पुढे बोलताना डॉ. कोल्हे म्हणले की, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या बहीण भावाकडे हा देश संघर्षाचे प्रतीक म्हणून बघत आहे. एकदा दिल्लीतील एक मोठे नेते सांगत होते की, काँग्रेस ही आजगरासारखी प्रचंड अवाढव्य आहे, पण ती सुस्त आहे असं वाटत राहतं, तसं आजगराकडे पाहिलं की वाटतं आजगर सुस्त आहे, पण तोच आजगर भुकेलेला असतो आणि त्याला भक्ष्य दिसतं तेव्हा आजगराऐवढी ताकद इतर कोणत्याही प्राण्यात नसते. अगदी तसं काँग्रेस असल्याचं आहे असे यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. दरम्यान डॉ. कैलास कदम, चंद्रकांत लोंढे, गौतम अरताडे बाबू नायर, जॉर्ज मॅथु, सोमनाथ शेळके, भरत वाल्हेकर, अण्णा कसबे, अक्षय उदगीरे, धनंजय आल्हाट, वहाब शेख, विठ्ठल शिंदे, नरेंद्र बनसोडे, सुप्रिया पोहरे, मनीषा गरुड, अनिता अधिकारी, उषा साळवी यांसह अनेक महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Keshav Upadhye-Pune BJP | संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट, जनताच यशस्वी होऊ देणार नाही ! भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा रोखठोक इशारा

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | अमोल कोल्हेंनी उडवली आढळरावांची खिल्ली, म्हणाले ”ते रडीचा डाव खेळत आहेत, थ्री इडियट चित्रपटातील…”

Cheating Fraud Case Pune | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडे आठ लाखांची फसवणूक