Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवु शकतो, ही महाराष्ट्राची ताकद आहे – डॉ. अमोल कोल्हे

राजगुरूनगर : Amol Kolhe | सध्याच्या परिस्थितीत विचारांचा वारसदार असणं फार महत्वाच आहे. देशाच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जबाबदारी फार मोठी आहे. देशाने निर्णय घेतलाय. देशातलं वातावरण बदलत आहे. त्यामुळेच दिल्लीचे ही तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज खेड विधानसभेच्या (Khed Vidhan Sabha) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ग्रामस्थांसोबत डॉ. कोल्हे यांनी संवाद साधला.यावेळी अशोक खंडेभराड, अतुल देशमुख, बाबाजी काळे, सुधीर मुंगसे, हिरामण सातकर, संजय घनवट, शिवाजी वर्पे, विशाल झरेकर, राजमाला बुट्टे, श्रद्धा सांडभोर, मनीषा सांडभोर, नीलिमा राक्षे, उषा बोराडे, अलका जोगदंड त्यांच्या समवेत सहभागी होते.(Amol Kolhe)

डॉ. कोल्हे म्हणाले की, अमरावतीचे भाजपचे उमेदवारच सांगत आहेत की, पंतप्रधान मोदींची लाट आता राहिलेली नाही. हेच चित्र सगळ्या देशात आहे. दक्षिण भारत असो की ईशान्य भारतासह अनेक राज्यात भाजप नाही.

या परिस्थितीत महाराष्ट्रतल्या माणसांची जबाबदारी मोठी आहे. आतापर्यंत आपण म्हणत होतो दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आता मात्र, दिल्लीचे ही तख्त पलटवू शकतो महाराष्ट्र माझा, ही महाराष्ट्राच्या मनगटातली ताकद दाखवून द्यायची आहे, अस आवाहन ही डॉ. कोल्हे यांनी केलं. (Shirur Lok Sabha)

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपले प्रश्न सुटणार नाहीत

देश पातळीवरची निवडणूक असली तरी विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत.
म्हणून ते वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करत आहेत.
विरोधी उमेदवार सुरवातीला म्हणाले, २०१९ चा बदला घेण्यासाठी निवडणूक लढवायची, आता वारं बदललं हे लक्षात
आल्यावर म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे. पण कोणाची पहिली निवडणूक असो किंवा शेवटची.
त्याने आपले प्रश्न सुटणार नाहीत. महागाई कमी होणार नाही, की हाताला काम मिळणार नाही.
याचाही विचार मतदारांनी करावा, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

Pune Fraud Case | पुणे: आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, आरोपीला जामीन मंजूर

Hadapsar Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार दिल्याने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ACB Trap Case | पाच हजार रुपये लाच घेताना पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Aaditya Thackeray In Maval Lok Sabha | आदित्य ठाकरे आज मावळमध्ये, संजोग वाघेरे भरणार उमेदवारी अर्ज, म्हणाले ”महागाईने त्रस्त जनता…”