बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काल दि.१२ सिंदखेड राजा येथे आयोजीत जिजाऊ जयंती महोत्सवानिमित्त संध्याकाळी जिजाऊ सृष्टीवर अमोल मिटकरी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी (Amol Mitkari) किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना बदनाम करण्याची सुपारी किरीट सोमय्या यांना देण्यात आली आहे. असे वक्तव्य अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर बोलताना म्हटले होते. मुळात ईडीची कारवाई त्यांना कळायला ते काय ब्रम्हज्ञानी आहेत का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, गणेश विसर्जनाच्या दिवशी हसन मुश्रीफ यांना विकत घेण्याचा भाजपचा डाव फसला. म्हणूनच त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली आहे. असा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला.
तसेच, यावर पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीत सेनेचे बंडखोर आमदार अपात्र ठरतील आणि लगेच हे सरकार कोसळेल.
असा अंदाज देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यामुळेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे, असे ते म्हणाले.
आमदार कडू यांनी यामुळेच विस्तार करता येत नसेल तर नका करू पण किमान खोटं बोलू नका,
असे मुख्यमंत्र्यांना सुनावले. त्यामुळे कडू यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी आपण केली आहे.
हा अपघात की शासकीय घातपात याची चौकशी होण्याची गरज असल्याचे अमोल मिटकरी यावेळी बोलताना म्हणाले.’
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याला खासदार किरीट सोमय्या काय उत्तर देणार हेही पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Web Title :- Amol Mitkari | action to buy mushrif failed criticism mla amol mitkari bachu kadu accident or political accident
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chitra Wagh | ‘…तर मग राठोडांना क्लिन चीट का दिली?’ चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
Chandrakant Patil | पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली; म्हणाले – ‘आमचा कुठलाही देव…’