Amol Mitkari | अमोल मिटकरींची खासदार किरीट सोमय्यांवर बोचरी टीका; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुणे येथील घरावर आज सकाळी ईडीकडून छापा टाकण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते आक्रमक पवित्र्यात पहायला मिळाले. सत्ताधारी भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. (Amol Mitkari) यानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचे काऊंटडाऊन सुरू झाल्याची टीका केली होती. त्यावर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

 

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, ‘किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. यापूर्वी किरीट सोमय्यांनी यशवंत जाधव, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी यांच्याबद्दल टोकाची भूमिका घेत मस्तीची भाषा केली होती. शिंदे गट आणि भाजपाला हे चौघेजण सरेंडर झाल्यावर चौकशा बंद करण्यात आल्या. पण, त्यांच्या धमकीला भीक न घालणाऱ्या नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.’ असे यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले.

यावर पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, ‘अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांना त्यांनी त्रास दिला. आणि आज परत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सोमय्यांनी पंगा घेतला आहे. अनिल परब यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर ही मस्तीची भाषा आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग, आयकर विभाग तुमच्या दावणीला बांधलेल्या संस्था आहेत.’ असा गंभीर आरोप देखील यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे.

 

दरम्यान हसन मुश्रीफांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की,
‘यावेळी सोमय्यांचा नेम चुकला आहे. कोल्हापुरच्या मातीशी जो नडतो, त्याला तेथील माती गाडते.
तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे. तुमची तोतली जबान आहे, त्याला झणझणीत चपराक करवीरवासी देतील.
शाहू भूमिच्या लाल मातीत तुमच्या पक्षासहित तुम्हाला नेस्तानाबूत केल्याशिवाय जनता राहणार नाही.
२०२४ ला किरीट सोमय्यांच्या पक्षांसह हिशोब चुकता करणार आहे. तुम्ही कितीही त्रास द्या, जनता शहाणी आहे.’
असा घणाघात अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे.

 

Web Title :- Amol Mitkari | amol mitkari attacks kirit somaiya over hasan mushrif rd raid home

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

DGP Rajnish Seth | ‘कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांचे विशेष पथक’; पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती

Cabinet Incentive Scheme | भीम अ‍ॅप आणि रूपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची भरीव तरतूद

Hasan Mushrif | चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ ऑफरबाबत बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…