Advt.

Amol Mitkari | ‘भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा’ – अमोल मिटकरी

बिलोली : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Mitkari | नांदेड मधील देगलूर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुका (Deglur by-election) होत आहेत. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाल्यामुळे येथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. याठिकाणी एका जागेसाठी अनेक पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात ही लढत असणार आहे. प्रचारादरम्यान बोलताना राष्ट्रवादीचे (NCP) नेते अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) वादग्रस्त सल्ला दिला आहे.

अमोल मिटकरी (Amol Mitkari) बोलताना म्हणाले की, भाजपचा (BJP) पैसा घ्या, पण मतदान काँग्रेसलाच करा, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आणि 2 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी या ठिकाणी एक जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना मिटकरी यांनी मतदारांना वादग्रस्त सल्लाही दिला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, पंढरपूरमध्ये मतदारराजाकडून जी चूक घडली, माझी इथल्या मतदारांना विनंती आहे की, ही चूक घडू देऊ नका.
तुमचे मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका.
त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे एक-एक कार्यालय 30 हजार कोटींचे आहे.
आता दिवाळी आहे. आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका. फटाके, फराळ घ्या.
भाजपाचा पैसा घ्यायचा पण महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मतदान करा. असं ते म्हणाले.

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला गुन्हे शाखेकडून अटक

Aryan Khan Drugs Case | अखेर ‘मन्नत’ पूर्ण ! मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खानचा जामीन मंजूर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Amol Mitkari | amol mitkari controversial advice voters take bjp money vote maha vikas aghadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update