Amol Mitkari | ‘ ज्याच्या डोक्यात शेणच भरले आहे, त्यांना…’ अमोल मिटकरींची पडळकरांवर टीका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपुरात आजपासून (दि. 19) विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात ‘संघर्ष’ नावाच्या पुस्तकाचे वाटप केले. त्यावरून भाजपचे विधानपरिषद आमदार गोपिचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केली. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या रोहित पवार यांना संघर्ष शब्दाचा अर्थ तरी कळतो का? असे पडळकर म्हणाले. त्यावर त्यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टोला लावला आहे. जी व्यक्ती पुस्तके वाचत नाही, त्या व्यक्तीला टीका करण्याव्यतिरिक्त काही धंदा आहे, असे मला वाटत नसल्याचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

 

जो माणूस पुस्तके वाचत नाही, त्या माणसाला दुसऱ्यांवर टीका करण्याशिवाय काही धंदा असेल असं मला वाटत नाही. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून जाणूनबुजून सीमावाद सुरू केला गेला. महामानवांचा अपमान केला जात आहे. यामुळे आमच्या पक्षाच्या आमदाराच्या संकल्पनेतून महापुरुषांच्या विचारांची पुस्तके सर्वांना देण्यात आली. भाजपच्या लोकांना महापुरुषांबद्दल आदर नाही.
यामुळे आम्ही केवळ त्यांनाच पुस्तके वाचायला दिली आहेत, असे अजिबात नाही.
भाजपच्या लोकांच्या मनात महापुरुषांबद्दल आदर वाढावा, यासाठी त्यांना ही पुस्तके दिली आहेत,
असे मिटकरींनी (Amol Mitkari) नमूद केले.

 

महापुरुषांचा अपमान करणारी जी घाण त्यांच्या मेंदूत आहे, ती बाहेर गेली पाहिजे.
तो आमचा एक उद्देश या पुस्तक वाटपाच्या मागे आहे.
पण ज्याच्या मेंदूमध्ये शेणच भरलेले असेल, त्या व्यक्तीला पुस्तकाचे महत्त्व कसे काय कळणार आहे,
असा टोला मिटकरी यांनी लगावला.

 

Web Title :- Amol Mitkari | amol mitkari on gopichand padalkar person whose brain is full of dung how know importance of book rohit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

Jayant Patil | ‘…हे ट्विट नक्की कोणी केले? पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या’ – जयंत पाटील

Nora Fatehi | फिफा वर्ल्ड कपमधील नोरा फतेहीचा ‘तो’ डान्स व्हिडिओ वायरल