Amol Mitkari | जितेंद्र आव्हाडांच्या अटकेवर अमोल मिटकर म्हणाले, ‘त्यांना त्याचे परिणाम भोगावे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी (Vartak Nagar Police Station) अटक केली आहे. त्यांच्यावर ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाचा प्रयोग बंद पाडल्याप्रकरणी आणि प्रेक्षकांना मारहाण केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन सरकारने मोठी चूक केली आहे. त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले आहेत.

 

 

“राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करून राज्य सरकारने परत एकदा या राज्यात हुकूमशाही नांदते आहे, याचा प्रत्यय करून दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद! मुठभर “खोप्या” तील “देशी” गुंडांच्या नादाला लागून सरकारने ज्या पद्धतीने हा प्रकार केला आहे, त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील.” असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

तसेच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जितेंद्र आव्हाड यांना केलेल्या अटकेवर अभिमान व्यक्त केला आहे.
जो चूक करतो त्यांना माफी आणि जो आंदोलन करतो त्यांना शिक्षा, असा प्रकार सध्या सुरु आहे.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे लढवय्ये नेते आहेत. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी नेले आहे.
शिवाजी महाराज आम्हाला देवाच्या समान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणी काही चुकीचे दाखवत असेल,
आणि त्यांच्या विरोधात जर कोणी आवाज उठवत असेल, त्यासाठी त्याला अटक होत असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

 

तसेच जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
होणाऱ्या कारवाईला समोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. मी न केलेला गुन्हा कबूल करणार नाही,
असा निर्धार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

 

Web Title :- Amol Mitkari | amol mitkari on jitendra awhad arrest har har mahadev movie screening

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | “प्रत्येकाने तुरुंगात जाण्याचे टाळले पाहिजे…” संजय राऊतांना आली प्रचिती

Maharashtra Politics | शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना धक्का, 13 वा खासदार शिंदे गटात सामील

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणात केतकी चितळेची उडी, आणखी ‘ही’ कलमं वाढवा अन्यथा…