Amol Mitkari | “शरद पवार आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही”; अमोल मिटकरींनी आव्हाडांना खडसावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Mitkari | अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचा फोटो वापरण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवार यांच्या समर्थकांकडून शरद पवारांचे फोटो वापरण्यात येत आहेत. फोटो वापरणाऱ्यांना शरद पवारांनीही थेट इशारा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awad) यांनी शरद पवारांचा फोटो वापरण्यास आक्षेप घेतला होता. यानंतर आव्हाडांना आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी शरद पवार यांचा फोटो वापरला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत. तर, विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत?, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

यावर अमोल मिटकरी यांनी आव्हाडांना खडसावले आहे. ते म्हणाले की, शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही आहेत. शरद पवार सर्वांचे आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी अशी वक्तव्ये करू नये,” अशा शब्दांत अमोल मिटकरींनी खडसावले आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

“मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील (Jayant Patil) प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीच आमचे फोटो वापरावे. ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला, त्यांनी माझा फोटो वापरू नये. माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा, हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय आहे,” असे शरद पवारांनी सांगितले आहे.

Web Title : Amol Mitkari | amol mitkari reply jitendra awhad over dont use sharad pawar photo

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 5 July Rashifal : मेष, कर्क आणि मीन राशीसाठी दिवस यश देणारा, वाचा १२ राशींचे दैनिक राशीभविष्य

Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या