Amol Mitkari | सदाभाऊंच्या माघारीनंतर मिटकरींचे ट्विट, म्हणाले- ‘सदाभाऊंना उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2022) 10 जागांसाठी 20 जुलै रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच (Rajya Sabha Election) या निवडणुकीत देखील चुरस निर्माण झाली आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. दरम्यान, विधान परिषदेसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) 6 उमेदवार रिंगणात आहे. सदाभाऊंनी अर्ज माघारी घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सदाभाऊंना सल्ला दिला आहे. सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, असे अमोल मिटकरी (Amol Mitkari)  यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. भाऊ त्या फडणविसांना सांगा, म्हणाव, म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय, आणखी दोन पावलं मागं येऊन सन्या गुमान बसलं, असं ट्विटमध्ये मिटकरी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जेंचा अर्ज मागे

भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी अगदी शेवटच्या क्षणी अर्ज माघारी घेतला.
तर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला.
या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले असले तरी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात 11 उमेदवार आहेत.

 

भाजप 5 जागा लढवणार
भाजप या निवडणुकीत पाच जागा लढवणार आहे. यामध्ये भाजप प्रवीण दरेकर (Praveen Darekar), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) या उमेदवाराची नावे जाहीर केली आहेत. तर शिवसेनेने (Shivsena) सचिन अहिर (Sachin Ahir), आमश्या पाडवी (Aamshya Padvi) यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) तर काँग्रेसकडून (Congress) भाई जगताप (Bhai Jagtap) आणि चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

 

कोणाकडे किती मतं ?
या निवडणूकीत मतांचा कोटा पाहिला तर सत्ताधारी महाविकास आघाडी कडे 169 मते आहेत. पक्षनिहाय काँग्रेस पक्षाकडे 44 मते असून त्यांनी दोन उमेदवार उभे केले आहेत. विजयासाठी 27 मतांची आवश्यकता असल्याने काँग्रेसला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी आणखी 10 मतांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीकडे 54 मते तर उरलेली शिवसेनेकडे मते आहेत. तसेच निवडणूकीत भाजपने 5 उमेदवार दिले आहेत आणि भाजपकडे 113 मते आहेत. त्यामुळे भाजपला देखील अपक्ष आमदारांवर अवलंबून राहावे लागेल.

 

Web Title :- Amol Mitkari | ncp leader and MLA amol mitkari tweet after sadabhau khot withdraws his application

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा