Amol Mitkari | ते बंडखोर 16 आमदार अपात्र ठरणार का?, सर्वत्र चर्चा सुरू असताना अमोल मिटकरींचे सूचक ट्विट,…तर शिंदे सरकार दसर्‍यापूर्वीच कोसळेल

मुंबई : Amol Mitkari | शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) वादावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण या सुनावणीवरच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) भवितव्य ठरणार आहे. जर बंडखोर 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे गटाचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्हा कुणाचे, या प्रश्नांना काहीच किंमत राहणार नाही. आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजे लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाल्यामुळे सर्वांनाच ही सुनावणी थेट पाहाता येत आहे. (Amol Mitkari)

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले, तर राज्यात काय होणार, याची सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) काल सायंकाळी केलेल्या ट्विटवरून सुद्धा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 16 आमदार अपात्र ठरल्यास हे सरकार दसर्‍यापूर्वीच कोसळेल..न्यायदेवता न्याय देईलच.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेकडून कपिल सिब्बल (Kapil Sibal) आणि अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) बाजू मांडत आहेत.
निवडणूक चिन्हाच्या आधी आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय व्हावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
मात्र, एकनाथ शिंदे गटाकडून (CM Eknath Shinde Group) आधी निवडणूक चिन्हावर निर्णय व्हावा, अशी मागणी अंतरिम अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

आजच्या सुनावणी दरम्यान दहाव्या सूचीचा मुद्दा चर्चेत आला.
शिवसेनेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या सूचीचा संदर्भ देत,
शिवसेनेमधून शिंदे गट बाहेरच पडल्याचे मान्य करत नसेल तर त्यांनी व्हिपचे पालन करुन बैठकीला हजेरी का लावली नाही, अशी विचारणा केली.

Web Title :- Amol Mitkari | ncp mla amol mitkari sc hearing shinde vs thackeray court arguments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | दहिहंडी उत्सवामध्ये गोळीबार करणाऱ्या चेतन ढेबे टोळीवर मोक्का, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 96 वी कारवाई

Sanjay Raut | दिलासा नाहीच! संजय राऊतांचा दसराही न्यायालयीन कोठडीतच, न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली