Amol Mitkari On Chandrakant Patil | “चंद्रकांत पाटलांच्या आशीर्वादाने ड्रग्सच्या घटना व्यवस्थित सुरु होत्या”; आमदार मिटकरींचा गंभीर आरोप

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Mitkari On Chandrakant Patil | मागच्या काही महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स पुण्यात सापडले होते. त्यानंतर कल्याणीनगर पोर्शे कार अपघातानंतर शहरातील पब आणि बार चा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यांनतर आता एफसी रस्त्यावरील लिक्विड, लेजर, लाऊंज (L3 – Liquid Leisure Lounge ) या हॉटेलमधील बॉशरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी , पोलीस , राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department Pune) विभागावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Pune Drug Case)

याबाबत माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मी पालकमंत्री असताना अशा प्रकारच्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत” असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे त्यांच्या विधानाचा अर्थ काय? किंवा त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कोणाकडे? याबाबत आता चर्चा सुरु झाल्या. (Pune Police)

मात्र, त्यानंतर पुन्हा या विधानावरून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते पुढं म्हणाले, “अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करता येत नाही ना? पुण्याची लोकसंख्या आधी १४ लाख होती. आता ७० लाख झाली. पुण्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय, शिक्षण, रुग्णालये चांगली झाल्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ” चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाहीत. कारण त्यांच्या आशीर्वादाने पुण्यात हे सर्वकाही व्यवस्थित सुरु होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथित आहेत” असे म्हणत मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dheeraj Ghate On Pubs In Pune | पुण्यातून पब संस्कृती हद्दपार करा, नाहीतर रस्त्यावर उतरु – धीरज घाटे (Video)

Pune Crime News | पुणे : मोबाईल चोरीचे कनेक्शन थेट चीनपर्यंत, स्वारगेट पोलिसांची कारवाई

Yerawada Pune Crime News | पुणे : बहिणीला पळून नेल्याच्या कारणावरुन तरुणीच्या भावाकडून ज्येष्ठ नागरिकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून, येरवडा परिसरातील घटना