ताज्या बातम्याराजकीयसांगली

Amol Mitkari On Raj Thackeray | अमोल मिटकरींनी राज ठाकरेंचा ‘खाज’ ठाकरे म्हणून उल्लेख करत केली मिमिक्री; म्हणाले…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Mitkari On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे जातीयवादी असल्याची टीका केली होती. या टीकेनंतर आता राष्ट्रवादी आणि मनसेचे नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत सांगलीमध्ये (Sangli) राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलेलं पाहायला मिळालं. त्यावेळी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंचा ‘खाज’ ठाकरे असा उल्लेख केला.

 

साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोकं आणि त्यात मेंदू दिला. पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं, असं म्हणत मिटकरींनी टोला लगावला. त्यासोबतच मिटकरींनी स्टेजवरून हनुमान चालिसा आणि मारूती स्तोत्रही म्हणून दाखवलं.

 

पेट्रोल (Petrol), गॅसवर (Gas), डिझेलवर (Diesel) बोलत नाहीत, नकला करतात…चांगला टाइमपास (Timepass) आहे. मुस्लिमांनी हनुमान चालिसाला (Hanuman Chalisa) विरोध कधी केला का ?, असा सवालही अमोल मिटकरींनी केला. महाराष्ट्रात जोरजोरात बोलण्याची स्पर्धा सुरू आहे. शरद पवारांवर बोलण्यासाठी भाजपची एक टीम तयार झाली असल्याचं मिटकरी म्हणाले.

 

दरम्यान, गोवा (Goa Election 2022) जिकल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर (Nagpur) मध्ये रोड शो केला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सत्ताबदल होणार सांगितलं. पण कोल्हापूरनंतर (Kolhapur) गप्प झाल्याचं म्हणत मिटकरींनी फडणवीसांवरही निशाणा साधला. आता मनसे नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करायला सुरूवात केली आहे.

 

Web Title :- Amol Mitkari On Raj Thackeray ncp amol mitkari on mns raj thackeray bjp devendra fadanvis kirit somaiya


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button