Amol Mitkari On Raj Thackeray | ‘संभाजीनगरला जावा किंवा अयोध्येला, मात्र चेहऱ्यावर ‘अध्यात्मिक आनंद’ झळकू द्या’ – अमोल मिटकरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Mitkari On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दोन मोठ्या घोषणा केल्या. महाराष्ट्र दिनी (Maharashtra Din) संभाजीनगर (Sambhajinagar) येथे जाहीर सभा आणि 5 मे रोजी अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची घोषणा केली. राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन राज ठाकरेंच्या घोषणेवरुन टीका केली आहे. (Amol Mitkari On Raj Thackeray)

 

अमोल मिटकरी म्हणाले, तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, मात्र श्रीरामाचे (Shriram) दर्शन घेताना आत्मीयतेने दर्शन घ्या, चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या, असे मिटकरी म्हणाले. तसेच हनुमान चालीसा च्या (Hanuman Chalisa) दोन ओळीही राज ठाकरेंना म्हणता येत नाही, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावला.

 

राज ठाकरे हे दंगली (Riot) भडकविण्याचे काम करत आहेत. राज्याला फुले, शाहू यांची परंपरा आहे. देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी संविधान (Constitution) दिले आहे. कायद्याचे राज्य आहे. कायद्याने राज्य चालते. हिंदू – मुस्लीम (Hindu – Muslim) यांना शिक्षणाचे, बेरोजगारीचे दरवाढीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असंही मिटकरी यांनी म्हटले.

 

आम्हीही जशास तसं उत्तर देऊ
राज ठाकरे म्हणाले, रामनवमी (Ram Navami) आणि हनुमान जयंतीनिमत्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या शोभायात्रांवेळी देशातील काही भागांमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या.
या घटनांवरुन राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. तुमच्या हातात जे शस्त्र आहे ते आमच्या तरुणांच्या हातात द्यायला लावू नका.
शोभायात्रांवर होणारे हल्ले थांबवा नाही तर आम्हीही जशास तसं उत्तर देऊ, असे ते म्हणाले.

 

Web Title :- ncp leader amol mitkari has criticized mns chief raj thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा