Amol Mitkari on Rohit Pawar | रोहित पवार व अमोल मिटकरी यांच्यामध्ये ट्विटर वॉर; मिटकरी म्हणाले,“तुम्ही लहान आणि नवखे…”

पोलीसनामा ऑनलाइन – Amol Mitkari on Rohit Pawar | राज्यामध्ये सध्या दोन पक्ष फुटले असून यामुळे राजकारणामध्ये नवीन समीकरणे तय़ार झाली आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंड करुन राज्य सरकारमध्ये (State Govt) सामील झाले. यानंतर राष्ट्रवादीमधील नेत्यांमधील एकमेंकाबद्दलची मते आता बाहेर येऊ लागली आहेत. राष्ट्रवादीतील अजित पवार गट (Ajit Pawar Group) व शरद पवार गट (Sharad Pawar Group) यांमधील नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु असून सोशल मीडियावर वॉर रंगलेले देखील दिसत आहेत. शरद पवार गटातील आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आणि राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीविरोधात भले मोठे ट्वीट शेअर केले होते. यामध्ये त्यांनी सरकारी खर्चाचे अनेक दाखले देत महायुती सरकारवर हल्लाबोल केला होता. यावरुन आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी रोहित पवारांना (Amol Mitkari on Rohit Pawar) ट्वीटरवर जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

राज्यामध्ये कंत्राटी भरती विरोधात आंदोलने चालू असून यावरुन आता राज्याचे वातावरण तापले आहे. कंत्राटी भरती (Contract Recruitment) विरोधात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. या दरम्यान आ. रोहित पवार यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर व अजित पवारांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती. रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते की, “एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.“ असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला.

https://x.com/RRPSpeaks/status/1701467873502539884?s=20

पुढे त्यांनी महायुती सरकारच्या खर्चाचा पूर्ण लेखाजोखा मांडला. त्यांनी लिहिले की, “बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर 150 कोटी खर्चासाठी, शासन आपल्या दारीच्या एकेका सभेसाठी 8-10 कोटी व त्याच्या जाहिरातीवर 52 कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळमाप शासनाला चालते. मग नोकर भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते? सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकारप्रमाणे (Central Government) कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.” अशा शब्दांमध्ये रोहित पवारांनी राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या विरोधात आवाज उठवला आणि अजित पवारांना देखील टोला लगावला. यावर आता आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्वीटवरुन रोहित पवारांना (Amol Mitkari on Rohit Pawar) प्रत्युत्तर दिले आहे.

https://x.com/amolmitkari22/status/1701655236606038277?s=20

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लिहिले आहे की, “दादा आपण लहान आणि नवखे आहोत अजुन राजकारणात!
ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेले आहेत.
सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते याचा मी स्वतः साक्षीदार आहे.
आता सरकारला सरकारचे काम करू द्या. आणि स्वतःला सावरा.” अशा शब्दांमध्ये अमोल मिटकरी य़ांनी
रोहित पवारांना चोख उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्याच दोन आमदारांमध्ये अजित पवारांवरील टीकेवरुन ट्विटर वॉर
चालू झाल्याचे दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘India’ Coordination Committee Meeting | शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘इंडिया’ च्या समन्वय समिती पहिली बैठक आज, अनेक मुद्द्यांवर चर्चेची शक्यता

Pornography Case | केवळ वासना नव्हे सेक्स, प्रेमसुद्धा आहे, पोर्नोग्राफी केसमध्ये केरळ हायकोर्टाची टिप्पणी