शेलारमामा, हिंदुत्वाचे सर्टिफिकेट रेशीमबागेत मिळेल की भाजप कार्यालयात ? राष्ट्रवादीच्या आमदारानं डिवचलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप ( BJP) आणि शिवसेनेमध्ये ( Shivsena) हिंदुत्वावरून राजकरण सुरु आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari) यांनी आता भाजप नेते आशिष शेलार ( Aashish Shelar) यांच्यावर निशाणा साधला आहे. “शेलारमामा, हिंदुत्वाचे सर्टिफिकेट रेशीमबागेत मिळेल की भाजप कार्यालयात?” असा तिखट सवाल मिटकरींनी शेलारांना अप्रत्यक्षपणे विचारला. शेलार यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका केल्यानंतर मिटकरी यांनीही उत्तर दिले आहे. हिंदुत्वाची ठेकेदारी फक्त संघ आणि भाजपकडे आहे, असे ‘शेलारमामां’ सांगतात ! मग सेनेव्यतिरिक्त जे सर्वसामान्य हिंदू आहेत, त्यांचं काय? हेही एकदा स्पष्ट करावं ! रेशीमबाग की भाजपा कार्यालय, हिंदुत्वाचे सर्टिफिकेट नेमकं कुठं मिळेल?” असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी ट्विट करत विचारला आहे.

 

आशिष शेलार काय म्हणाले होते
आशिष शेलार यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मेळाव्यात हिंदुत्वाविषयी मांडलेल्या विचारांचा शिवसेनेकडून विपर्यास करुन सोयीस्कर असा अर्थ काढण्यात आला असल्याचे म्हटले होते. सरसंघचालकांची ती व्याख्या म्हणजे हिंदुत्वाची खरी त्वचा आहे. मात्र, शिवसेनेने सत्तेसाठी या त्वचेचा त्याग केला. आता शिवसेनेच्या अंगावर केवळ हिंदुत्वाची शाल पांघरलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाची त्वचा आणि शाल यांची तुलना होऊच शकत नाही, असे म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्त्व म्हणजे अंगावरची कातडी असलेली त्वचा आहे आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) यांचे हिंदुत्व म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackery) यांची हिंदुत्त्वाची शाल सत्तेसाठी काढून टाकली, अशा पद्धतीचं आहे. त्वचा आणि शाल याची तुलना होऊ शकत नाही!” अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दरम्यान,टाळ्या आणि थाळ्या याचा हिंदुत्त्वाशी संबंध नव्हता, तो आपल्या कोरोना योद्धयांचा, कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या सर्व सेवकांचा उत्साह वाढविण्यासाठी टाळ्या आणि टाळ्यांचा विषय होता” असंही शेलार यांनी म्हटले होते. त्यामुळे आता भाजपकडून राष्ट्रवादीला काय उत्तर मते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You might also like