Amol Mitkari Vs Gopichand Padalkar | राष्ट्रवादीचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा, मिटकरी म्हणाले – ‘वंचितांचे प्रतिनिधी 50 लाखांच्या गाड्या घेऊन फिरत नाहीत’

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांच्या कारवर सोलापूरमध्ये (Solapur) दगडफेक झाली. या घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पडळकरांसह भाजप नेत्यांनी (BJP leader) या हल्ल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जबाबदार धरलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. Amol Mitkari Vs Gopichand Padalkar ncp mlc amol mitkari slams bjp mlc gopichand padalkar over solapur incident

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला
बहुजन संवाद कार्यक्रमांतर्गत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे सोलापूर शहरात (Solapur City) सध्या घोंगडी बैठका घेत आहेत. काल ते शहरातील मड्डी वस्ती परिसरात एसबीआय कॉलनी (SBI Colony) येथे बैठकीला आले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर एक दगड भिरकावण्यात आला. त्यात गाडीची समोरची काच फुटली. हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) लोकांनीच केला असून प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला आहे, असे पडळकर या घटनेनंतर म्हणाले होते.

भाजपनं ठरवून केलेला स्टंट
गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा भाजपनं ठरवून केलेला स्टंट (BJP’s stunt) आहे.
प्रसिद्धीसाठी हे सगळं केलं गेलं आहे. पडळकरांची आजची प्रतिक्रिया मी पाहिली.
दिल्लीत, उपेक्षित, शोषित, वंचितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला असं ते म्हणत आहेत.
पण वंचित आणि शोषितांचे प्रतिनिधी असं लँड रोव्हर (Land Rover) किंवा 40-50 लाखांच्या गाड्या घेऊन फिरत नसतात,
असा टोला आमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी लगावला आहे.

वाय, झेड सेक्युरिटीसाठी कटकारस्थान
दगडफेक झाली तर धोका आहे असं समजून वाय, झेड सेक्युरिटी (Y, Z Security) मिळेल असं त्यांना वाटत असावं.
त्यासाठी भाजपनंच (BJP) हे सगळं कटकारस्थान केलं असावं.
राज्यातील जनतेला हे चांगलं माहित आहे, असंही अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) म्हणाले.

Web Titel : Amol Mitkari Vs Gopichand Padalkar ncp mlc amol mitkari slams bjp mlc gopichand padalkar over solapur incident