Amol Mitkari vs Shahaji Bapu Patil | ‘सोंगाड्या, जॉनी लिव्हर आणि गुरु’, शहाजीबापू आणि मिटकरींमध्ये वार-पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Mitkari vs Shahaji Bapu Patil | राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले. यानंतर शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पहायला मिळत आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) अमोल मिटकरी आणि शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Amol Mitkari vs Shahaji Bapu Patil) यांच्यात शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे. शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या टीकेवर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना शहाजीबापू (Shahaji Bapu Patil) म्हणाले, अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे विचार करण्यासारखं राजकारणातलं पात्र नाही. ते सोंगाड्या आहेत. मिटकरीने संजय राऊत (Sanjay Raut) यांना गुरु मानलं आहे, असं मला वाटतं. राऊतांचे जे झालं ते एक दिवस याचं होणार आहे. राऊतांची जागा आपल्याला मिळेल म्हणून नटूनथटून तेल लावून टिव्हीपुढे येतंय. शरद पवार (Sharad Pawar) यांनी चुकीची केलेली निवड म्हणजे अमोल मिटकरी, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.

 

शहाजीबापू पाटील यांच्या टीकेवर पलटवार करताना अमोल मिटकरी म्हणाले, शहाजीबापू पाटील शिंदे गटाचे जॉनी लिव्हर (Johnny Lever) आहेत.
महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस त्यांच्याकडे करमणूक म्हणून पाहतो. माझ्या भविष्याची चिंता त्यांनी करु नये.
शिंदे गटाचा कसा कार्यक्रम वाजला आहे, याची चिंता करावी. स्वत:च्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं.
हा महाष्ट्राची करमणूक करणारा नवीन जॉनी लिव्हर आहे,
तसेच तुम्ही कितीही डायलॉगबाजी केली तरी तुम्हाला कॅबिनेट तर सोडा साधं राज्यमंत्रीपद देखील भेटणार नाही.
तुमची शेवटची टर्म आहे ही, असं प्रत्युत्तर मिटकरी यांनी दिलं.

 

Web Title :- Amol Mitkari vs Shahaji Bapu Patil |shahaji bapu patil is jonny leaver of shinde camp says ncp leader amol mitkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गोळीबार करुन 3.5 कोटी लुणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश, 1.43 कोटी रुपये जप्त

 

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

 

e-Search Report Maharashtra | ऑनलाइन मिळकतींचा शोध (ई-सर्च रिपोर्ट) घेण्याची सुविधा पुन्हा सुरू