भाषण थांबवल्यानंतर अमोल पालेकरांची आली पहिली प्रतिक्रीया

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एखाद्या वक्त्याला कार्य़क्रमासाठी आमंत्रीत करण्यात येते त्यावेळी आमंत्रित करतानाच काय बोलावं हे सांगणं गरजेचं असल्याचे अमोल पालेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावे लागले होते. हा प्रकार मुंबईतील एनजीएमएतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात घडला होता. यानंतर अमोल पालेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रीया दिली.

Video : सरकारवर टीका केल्याने भर कार्यक्रमात अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण रोखलं

पालेकर यांच्या या पत्रकार परिषदेच त्यांची पत्नी संध्या पालेकर यांचीही उपस्थिती होती. त्यासुद्धा एनजीएमएमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजर होत्या आणि जे काही घडलं ते सर्व त्यांच्या समोरच घडलं असल्याचे पालेकर यांनी सांगितले.

पुढे बोलताना अमोल पालेकर म्हणाले, आपण कार्यक्रमावेळी केलेल्या भाषणामध्ये एनजीएमए, त्यात करण्यात आलेले महत्त्वाचे बदल आणि ते बदल करण्याचे निर्णय नेमके कोणी घेतले याविषयीचं वक्तव्य केलं. मुळात त्या मंचावरुन एनजीएमएबद्दल बोलणं हे औचित्य कसं नव्हतं हा मुद्दाच नाही’, असं म्हणत आपण केलेलं वक्तव्य गैर कसं? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कार्यक्रमात झाल्या प्रकाराला आणि या विषयाला फाटे फोडण्यात आले हे संपूर्ण चुकीचं असल्याचं ठाम मत त्यांनी यावेळी मांडलं.

अमोल पालेकर नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.  यावेळी अमोल पालेकर यांनी भाषणात म्हटलं की, आर्ट गॅलरीने कसं आपलं स्वातंत्र्य गमावलं आहे. त्यावेळी अमोल पालेकरांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. भाषणात त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा एक निर्णय कसा चुकीचा होता, हे सांगण्यात सुरुवात केली. परंतु, व्यासपीठावर बसलेल्या एनजीएमएच्या काही सदस्यांनी यावर आक्षेप घेतला.