‘बाबो’साठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल कागणेने आपले नशीब आजमावण्यासाठी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. अमोल निर्माताने ‘बाबो’ या आगामी चित्रपटासाठी चक्क महिन्याभरात ७ किलो वजन घटविले आहे. मनोरंजन क्षेत्रात आपले नशीब उजळण्यासाठी अनेक कलावंत प्रयत्न करतात. या निर्मात्याने असे काही प्रयत्न केले आहे. ‘बाबो’ हा चित्रपट ३१ मे ला प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/BwjFOMapXRc/

निर्माता अमोल कागणने एका मुलाखतीत सांगितले की, ‘मला ‘बाबो’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटासाठी लागेल तेवढे कष्ट घेण्याची तयारी मी करणार आहे. हिरोची भूमिका करण्यास मी खुप उत्सुक आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मी सज्ज झालो आहे. आलीकडे लॉन्च झालेले ‘बाबो’ मधील ‘म्याड रं’ हे गाण्याच्या टिझरमधून आपल्याला माझी एक झलक पहायला मिळेल’.

दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करणारे अमोल कागणे सध्या अभिनयातले खाचखळगे जाणून घेत आहे. त्यासाठी मी खुप मेहनत घेईल असेही त्यांनी सांगितले आहे. एका महिन्याने चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असून माझ्याकडे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ आहे. प्रत्यक्षात दिसणारे व्यक्तिनत्व पडद्यावर तितकेच आकर्षक दिसावे याकरिता मी डाएट आणि वर्कआउटला सुरुवात देखील केली आहे. त्याचा अतिशय चांगला रिझल्ट मला मिळाला, जो तुम्ही फोटोत पाहू शकाल. अमोलची ‘म्याड रं’ गाण्यातली धमाल सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे.