cyclone amphan : ‘अन्फान’ चक्रीवादळामुळं हाहाकार ! बुडून गेलं कोलकत्ता विमानतळ

पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – अम्फानमुळे पश्चिम बंगाल हादरले आहे. ताशी १६५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले तेव्हा लोक घाबरून गेले. कोलकाता विमानतळावर उभी असलेली ४० टन (४० हजार किलो) ची विमाने देखील अम्फान चक्रीवादळामध्ये हादरली.

लोक म्हणाले कधी नाही बघितला असा विध्वंस
बंगालमधील बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी असे वादळ यापूर्वी कधीही पाहिले नाही. तर काही ज्येष्ठ म्हणाले की तीस दशकांपूर्वी त्यांनी असा विध्वंस पाहिला होता. अम्फान चक्रीवादळ ओडिसा मार्गे पश्चिम बंगालकडे पोहोचले आहे.

नदीत विमाने उतरवल्यासारखे वाटत होते
विमानतळावर उभ्या असलेल्या विमानांकडे बघून वाटत आहे की, जणू एखाद्या नदीत ती उतरवली गेली आहेत. विमानाची चाके पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. सर्वत्र फक्त पाणीच दिसत आहे.

६ तास चालू होते तांडव
सुमारे सहा तास बंगालमध्ये चक्रीवादळाचे तांडव सुरू होते. बंगालमध्ये चक्रीवादळामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानतळावर चालणार्‍या कार्गो सेवेची उड्डाणेही बंद केली आहेत.

विमानतळावर नदीसारखे दृश्य दिसले
अम्फानमुळे कोलकातामध्ये अनेक ठिकाणे पाण्यात बुडाली आहेत. इथले विमानतळही पाण्यात बुडाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे विमानतळाचा काही भाग प्रभावित झाला आहे. धावपट्टीचे दृश्य एका विशाल नदीसारखे दिसत आहे. हँगर्स क्षेत्रही जलमय दिसत होते.

४० टन जहाजेही हादरली
कोलकाता विमानतळावर लोकांनी प्रथमच हे पाहिले. अम्फान वादळाच्या वेगापुढे ४०-४० टन जहाजेही हादरली. त्यांच्या चाकांना चॉक्स लावले होते, जेणेकरून हवेमध्ये फिरत एकमेकांना नुकसान पोहोचवणार नाहीत.

सगळीकडे दिसला अम्फानचा परिणाम
चक्रीवादळ अम्फानमुळे पश्चिम बंगालमधील कोलकातासह किनारपट्टीवरील भागात नुकसान झाले. ख्रिस्तोफर रोडवरील खांबाच्या वायर तुटून रस्त्यावर पडल्या. अनेक घरांची छप्परे उडून गेली. रस्त्यावर पाणी जमा झाले.

पोलिसांनी इशारा दिला
पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळ अम्फानचे परिणाम दिसू लागले आहेत. दिघामध्ये समुद्रात उंच लाटा आणि वादळी वारे वाहू लागले आहे. अम्फान पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशातील हटिया बेटावरच धडकणार आहे. दरम्यान स्थानिक पोलिस लोकांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरातच राहण्याचा इशारा देत आहेत.