पाय नसताना कुबड्यांवर शेतात काम करताना दिसला शेतकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कारणे शोधायची आणि काहीही करायचे नाही, हे जीवनातील सर्वात सोपे काम आहे. परंतु जर तुमची इच्छाशक्ती मजबूत असेल तर समोर किती आव्हाने याचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही आपल्या सर्व समस्या दूर करू शकता, आणि त्यामधून बाहेर पडू शकता.

एका शेतकर्‍याने हाच धडा तमाम लोकांना दिला आहे, जो एक पाय नसतानाही शेतात काम करत आहे. सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ वायरल होत आहे.

हा व्हिडिओ भारतीय वन सेवेतील अधिकारी मधु मीठा यांनी आपल्या सोशल मीडियावर शेयर केला आहे. व्हिडिओमध्ये एका शेतकर्‍याची काम करण्याची तीव्र इच्छा दाखवण्यात आली आहे, जो पाय नसताना शेतात काम करत आहे. यासोबत त्यांनी लिहिले आहे की, कोणतेही शब्द या व्हिडिओसोबत न्याय करू शकत नाहीत.

35 सेकंदाच्या व्हिडिओत एक शेतकरी एका हातात फावड़ा आणि दुसर्‍या हातात कुबडी घेऊन शेतात चालताना दिसत आहे. शेतकरी कुबडीवर स्वताचा तोल सावरतो आणि फावड्यासह काम करण्यास सुरूवात करतो. तो असे अनेकवेळा आपल्या दृढ इच्छाशक्ती असे करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आतापर्यंत तो सुमारे 3 लाख लोकांनी पाहिला आहे. तसेच असंख्य लोकांनी रिट्विट केला आणि कमेंट करून शेतकर्‍याचे धैर्य वाढवले आहे.