पोलीसनामा ऑनलाइन : Amrapali Dubey | भोजपुरी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे हिने आज आपल्या अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीत चांगलाच विक्रम गाठला आहे. आम्रपाली हिचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत असतात. आम्रपाली तिच्या स्वभावामुळे जास्त ओळखली जाते. आम्रपालीने अनेक मुलाखतींमध्ये स्वतः तिच्या या स्वभावाबद्दल व्यक्त झाली आहे. सध्या आम्रपालीचे अनेक किस्से सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (Amrapali Dubey)
आज आम्रपालीचे जगभरात अनेक चाहते आहेत. मात्र आम्रपालीला बॉलीवूडमधील अभिनेता सलमान खान फारच आवडतो. एका कार्यक्रमा दरम्यान सलमानला स्टेजवर पाहताच अभिनेत्री खूपच आश्चर्य चक्कीत झाली होती. त्यावेळी तिने सलमान खानला विचारलेला प्रश्न चर्चेचा विषय बनत होता. यानंतर आम्रपाली ने एका मुलाखती दरम्यान तिच्या स्वभावाबद्दल तिला विचारले असता ती उघडपणे व्यक्त झाली. 2014 साली भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये आम्रपालीने पाऊल ठेवत आपल्या अभिनयाचे ठसे उमटवायला सुरुवात केली. आम्रपालीचे चित्रपट आणि मालिका केवळ चाहतेच नाही तर भोजपुरी जगातील मेगास्टार निरहुआ यांना देखील आवडतात. आम्रपाली खूपच बिंदास स्वभावाची व्यक्ती म्हणून ओळखली जाते. आम्रपालीच्या पर्सनॅलिटी पुढे एका शब्दात वर्णन करायचे झाल्यास एक चंचल व्यक्ती म्हणून तिची ओळख निर्माण होते. (Amrapali Dubey)
आम्रपाली आणि निरहुआ यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडते.
प्रेक्षकां बरोबरच आम्रपालीला देखील नेहमीच निरहुआ सोबत काम करायला कंफर्टेबल वाटत असल्याचे वक्तव्य
तिने अनेकदा केले आहे. एवढेच नाही तर ते तिचा चांगला सहकलाकार आहे असेदेखील तिने म्हंटले होते.
येणाऱ्या काळात आम्रपालीचे अनेक चित्रपट रांगेत आहेत.
त्यातीलच एक म्हणजे ‘शादी मुबारक’ या चित्रपटात ती लवकरच झळकणार आहे. सध्या आम्रपाली निरहुआ यांच्यासोबत एका मालिकेत दिसत आहे.
Web Title :- Amrapali Dubey | bhojpuri actress aamrapali dubey shares har naughty behavior on set of bhojpuri films bhojpuri cinema news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर टीका; म्हणाले…