लगा के व्हॅसलीन : आम्रपाली दुबे आणि खेसारी लाल यादवचं नवं गाण ‘रिलीज’, सोशलवर ‘राडा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भोजपुरी सिनेमा मेहंदी लाग के रखना च्या पहिल्या पार्टमध्ये लगा के फेअर लवली या गाण्यानं चाहत्यांना थिरकायला मजबूर केलं होतं. या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टमध्ये असंच एक गाणं आहे जे सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत असल्याचं दिसत आहे. लगा के व्हॅसलीन असं या गाण्याचं नाव आहे. अलीकडेच हे गाणं रिलीज करण्यात आहे. या गाण्यातील भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबेचा शानदार परफॉर्मंसही चाहत्यांना आवडला आहे.

डायरेक्टर रजनीश मिश्रानं मेहंदी लगा रखना 3 या सिनेमात पुन्हा एकदा एक प्रयोग केला आहे. सध्या लगा के व्हॅसलीन या गाण्याची तरुणांमध्ये खूप चर्चा होताना दिसत आहे. रिलीज होताच हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आहे. काही दिवसांतच गाण्यानं 2 मिलियन व्ह्युज घेतले आहेत. या आम्रपाली दुबेसोबत खेसारी लाल यादव दिसत आहे.

सध्या सोशलवर हिट होत असलेलं हे गाणं खेसारी लाल यादव आणि प्रियंका सिंह यांनी मिळून गायलं आहे. यादव राजनं हे गाणं लिहलं आहे. गाण्याचं म्युझिक डायरेक्शन रजनीश मिश्रानंच केलं आहे. या गाण्याच्या प्रतिसादामुळे निर्मातेही प्रचंड खुश झाले आहेत. या सिनेमातील प्रत्येक गाणं चार्टबस्टर होताना दिसत आहे. मेहंदी लगा के रखना 3 हा सिनेमा या वर्षातील सर्वात मोठा सिनेमा होणार आहे असंही निर्मात्यांनी म्हटलं आहे.