Amravati ACB Trap | 20 हजार रुपये लाच घेताना मंडळ अधिकारी, कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – मुरुम वाहतूक ट्रॅक्टर हद्दीत चालू देण्यासाठी कोतवालामार्फत 20 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या (Accepting Bribe) मंडळ अधिकाऱ्यासह कोतवाल यांना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Amravati ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. अमरावती एसीबीच्या पथकाने (Amravati ACB Trap) ही कारवाई बुधवारी (दि.21) जुना धामणगाव येथील मंडळ अधिकारी कार्यालयात केली.

 

मंडळ अधिकारी देविदास रामचंद्र उगले Devidas Ramchandra Ugale (वय-56), कोतवाल राहुल साहेबराव तायडे Rahul Sahebrao Taide (वय 32) अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत जुना धामणगाव येथील 25 वर्षीय व्यक्तीने बुधवारी (दि.21) अमरावती एसीबीकडे (Amravati ACB Trap) लेखी तक्रार केली आहे.

 

जुना धामणगाव रेल्वे येथील मंडळ अधिकारी देविदास उगले यांनी तक्रारदार यांचा मुरूम वाहतूक ट्रॅक्टर हद्दीत चालू देण्यासाठी कोतवाल राहुल तायडे यांच्या मार्फत 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी (Demanding Bribe) केली. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रादरा यांनी याबाबत अमरावती एसीबीकडे तक्रार केली.

अमरावती एसीबीने पडताळणी केली असता उगले यांनी कोतवाल तायडे याचे मार्फत 30 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजार स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. कारवाई दरम्यान उगले यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम तायडे यांच्याकडे देण्यास सांगितले. तायडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारून उगले यांचे जवळ दिली. पथकाने दोघांना 20 हजार रुपये लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. आरोपीविरुद्ध धामणगाव रेल्वे पोलीस ठाण्यात (Dhamangaon Railway Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती पोलीस अधिक्षक मारुती जगताप (SP Maruti Jagtap),
अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत (Addl SP Arun Sawant), पोलीस उप अधीक्षक देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware),
पोलीस उपअधीक्षक संजय महाजन (DySP Sanjay Mahajan),
पोलीस उपअधीक्षक शिवलाल भगत (DySP Shivlal Bhagat)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील (Police Inspector Praveen Patil),
पोलिस निरीक्षक केतन मांजरे (Police Inspector Ketan Manjare), पोलीस अंमलदार राहुल वंजारी,
युवराज राठोड, वैभव जायले, चालक पोलीस उपनिरीक्षक सतीश किटूकले यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Amravati ACB Trap | Board officer, Kotwal in anti-corruption net while taking Rs 20 thousand bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uday Samant | आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारीत ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ – उद्योगमंत्री उदय सामंत

Aaditya Thackeray | राहुल शेवाळेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आणि मुख्य…’

Raj Thackeray | सोशल मिडीया वापरावरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना खडे बोल; म्हणाले…