Amravati ACB Trap | तीस हजारांची लाच घेताना सरपंचासह पती लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; चांदुर तालुक्यातील घटना

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – चांदुर तालुक्यातील शिरजगाव बंड येथे विविध कामे केलेल्या बिलांचे पैसे मिळण्यासाठी खुद्द सरपंचांनी लाच मागितल्याचा (Amravati ACB Trap) प्रकार घडला आहे. या प्रकरणी लाचलुचपत विभागाला (Amravati ACB Trap) तक्रार मिळताच विभागाने सापळा कारवाई करत आरोपी सरपंच आणि त्यांच्या पतीला जेरबंद केले.

 

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी 18 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत शिरजगाव बंड येथील सरपंच आणि त्यांचे पती यांच्याजवळ ग्रामपंचायतीच्या केलेल्या विविध कामांच्या बिलांचे पैसे मागितले. परंतु, सरपंच शिल्पा धीरज इंगळे (वय 39) आणि त्यांचे पती धीरज रामरावजी इंगळे (वय 43) यांनी कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार लाचलुचपत विभागाला (Amravati ACB Trap) देण्यात आली. त्यानुसार 20 नोव्हेंबर आणि 07 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईत पंचासमक्ष सरपंच शिल्पा इंगळे व त्यांचे पती धीरज इंगळे यांनी तक्रारदार यांना बिल मंजूर करण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी करून ते स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

 

त्यानुसार गुरुवारी (दि. 8 डिसेंबर) करण्यात आलेल्या सापळा कारवाईत अंकुश ढाबा, शिरजगाव बंड, चांदुर बाजार ते अचलपूर रोड येथे पंचासमक्ष सरपंच शिल्पा इंगळे आणि त्यांचे पती धीरज इंगळे यांनी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक केली. दोन्ही आरोपींच्या विरोधात चांदुर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत,
अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, पोलीस उपअधीक्षक शिवलाल भगत,
पोलीस निरीक्षक केतन मांजरे, पोलीस निरीक्षक अमोल कडू, पोलीस नाईक युवराज राठोड, शैलेश कडू,
पोलीस हवालदार स्वाती सरोदे, पोलीस उपनिरीक्षक बारबुद्धे यांनी केली.

 

Web Title :- Amravati ACB Trap | Sarpanch along with husband in the net of bribery department while taking bribe of thirty thousand; Incidents in Chandur Taluka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘तू माझ्या मित्राचा मर्डर केला, तुझी विकेटच पाडतो’ म्हणत तरुणावर हल्ला; हडपसर परिसरातील घटना

Driving Licence lost | ड्रायविंग लायसन्स हरवलंय? चिंता नको ‘हे’ करा

CM Eknath Shinde | गुजरात विधानसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

SC On Property Dispute | सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांना सल्ला; म्हातारपणाची काळजी घेतील, असे लिहून घ्या