Amravati ACB Trap | 1500 रुपये लाचेची मागणी करुन 500 रुपये लाच घेताना गुन्हे शाखेतील दोन पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रारदार यांच्यावर कलम 110 प्रमाणे दाखल असलेली प्रतिबंधक केस (Prevention Case) निकाली काढण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch), अमरावती ग्रामीण (Amravati Rural) येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Police Personnel) 500 रुपये लाच घेताना (Accepting Bribe) अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Amravati ACB Trap) रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.20) स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण कार्यालयात करण्यात आली. अमरावती एसीबीच्या पथकाने (Amravati ACB Trap) केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

पोलीस हवालदार विशाल रामरावजी हरणे (Vishal Ramraoji Harne), पोलीस नाईक प्रशांत महादेवराव ढोके (Prashant Mahadevrao Dhoke) अशी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत तिवसा तालुक्यातील ग्राम उंबरखेड येथील 55 वर्षीय व्यक्तीने अमरावती लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडे (Amravati ACB Trap) 10 ऑगस्ट 2022 रोजी तक्रार केली होती. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सापळा रचून दोघांना रंगेहात पकडण्यात आले.

पोलीस हवालदार हरणे आणि पोलीस नाईक ढोके हे अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर कलम 110 प्रमाणे दाखल असलेली प्रतिबंधक केस निकाली काढण्याकरिता दोघांनी 1500 रुपये लाच मागितली होती. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Amravati) तक्रार केली.

तक्रारदार यांनी अमरावती एसीबीकडे तक्रार केल्यानंतर 11 आणि 17 ऑगस्ट रोजी पडताळणी केली.
पडताळणी कारवाई दरम्यान हरणे आणि ढोके यांनी तक्रारदार यांना 110 चे प्रतिबंधक कार्यवाही लवकर निकाली
काढण्याकरिता 1500 रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
आज (मंगळवार) अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला.
हरणे याला तक्रारदार यांच्याकडून एकूण लाचेच्या रक्कमे पैकी 500 रुपये लाच रक्कम स्वीकारताना ताब्यात घेण्यात
आले. हरणे आणि ढोके यांच्या विरुद्ध गाडगेनगर अमरावती शहर पोलीस ठाण्यात
(Gadgenagar Amravati City Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे (Amravati Zone) पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड
(SP Vishal Gaikwad), अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत (Addl SP Arun Sawant), देविदास घेवारे
(Addl SP Devidas Gheware), पोलीस उपअधीक्षक संजय महाजन
(Deputy Superintendent of Police Sanjay Mahajan) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल
कडू (Police Inspector Amol Kadu), केतन मांजरे (Police Inspector Ketan Manjare),
पोलीस नाईक विनोद कुंजाम आणि अमरावती एसीबी पथकाने केली.

Web Title :-Amravati ACB Trap | Two policemen of crime branch caught in anti-corruption net while demanding Rs 1500 bribe and accepting Rs 500 bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune-Purandar Airport | पुरंदर विमानतळाचे भूसंपादन एमआयडीसी कायद्यानुसार (MIDC Act)

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन दिल्ली दौरा करणार, रुम्स देखील बुक केल्या