Amravati Anti Corruption | 2 लाखाची लाच घेताना कनिष्ठ अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – केलेल्या कामाची त्रयस्थ संस्थेकडून पाहणी करुन कामाचा अहवाल देण्यासाठी 2 लाखाची लाच घेताना (Accepting Bribe) शेंदुर्जना घाट नगर परिषदेतील (Shendurjana Ghat Nagar Parishad) कनिष्ठ अभियंत्याला (junior engineer) अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा (Amravati Anti Corruption) रचून अटक केली. पराग पद्माकर कठाळे Parag Padmakar Kathale (वय-35) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. ही कारवाई वरुड येथील सार्वजनिक बांधाकाम विभागाच्या शासकीय निवासस्थानामध्ये (Amravati Anti Corruption Trap) गुरुवारी (दि.13) करण्यात आली. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

तक्रारदार हे कंत्राटदार आहेत. तक्रारदार यांनी नगर परिषद शेंदुर्जना घाट येथील जलतरण तलावाचे (swimming pool) काम केले आहे. या कामाची त्रयस्थ संस्थेकडून पाहणी करुन कामाबाबत अहवाल देण्यात येणार होता. ही पाहणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती (Government Engineering College, Amravati) यांच्याकडून करण्यात येणार होती. या तपासणीचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी कठाळे यांनी लाच मागितली.

 

पराग कठाळे यांनी कामाच्या एकूण बिलाच्या एक टक्का याप्रमाणे दोन लाखांची लाच मागितली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Amravati Anti Corruption) तक्रार केली.
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यावेळी कठाळे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय निवासस्थानामध्ये सापळा (Anti Corruption Trap) रचून तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये स्विकारताने पराग कठाळे याला रंगेहात पकडण्यात आले.

 

Web Title :- Amravati Ani Corruption | amravati junior engineer arrested bribe 2 lakh by anti corruption team

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Air India – Tata Sons | 10 दिवसात टाटांकडे असेल एअर इंडियाची चावी, सरकारने दिला ‘हा’ महत्वाचा संदेश

Top Indian IT Companies | टॅलेंट हायर करण्याची स्पर्धा, IT कंपन्या 1 लाखापेक्षा जास्त फ्रेशर्सला देणार नोकरी

Shivsena Dasara Melava | छापा-काटा ! हिंमत असेल तर पाडून दाखवा; CM उद्धव ठाकरेंचे भाजपला ‘आव्हान’