भाजपाला मतदान केल्याच्या संशयावरुन महाराष्ट्रात बसपाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – अमरावतीमध्ये बसपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तुफान राडा झाला. लोकसभा निवडणुकीत पैसे खाल्ल्याचा आरोप करत, भाजपाला मतदान केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी करुन पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. बसपाचे महाराष्ट्राचे प्रभारी संदीप ताजने यांना संतप्त कार्यकर्त्यांनी लाथा-बुक्क्यांसह खुर्च्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे तणावाचे वातावरण होते.

लोकसभा निवडणुकीत पराभावाला सामोरे गेल्यानंतर बसपाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बैठक बोलावली होती. विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रमोद रैना हे उत्तर प्रदेशातून आले होते.

बैठकीला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार होते. बैठकीत नेत्यांकडून मार्गदर्शन करण्यास सुरुवात करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी तुम्ही दलाली करत असल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी हॉलमधील खुर्चां फेकून मारल्या. कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत पदाधिकाऱ्यांचे कपडे फाटले. तर काही पदाधिकाऱ्यांनी तेथून पळ काढला.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

रात्री नियमित प्या १ ग्लास दूध, आरोग्यासाठी आहे फायदेशीर

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

आरोग्यासाठी मुलांना द्यावे ‘एग सलाद’, होतील ‘हे’ फायदे

आहाराकडे लक्ष दिलेत तर मुले राहतील निरोगी

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

You might also like