Amravati Crime | अमरावतीत ‘हवाला’कांड ! 2 चारचाकी वाहनांमधील 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त, 4 गुजराती व्यक्ती ताब्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावती (Amravati Crime) शहरातील फरशी स्टॉप परिसरातून शहराबाहेर जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक राजापेठ पोलिसांनी (Rajapeth police) मंगळवारी (दि.27) पहाटे पाचच्या सुमारास केली आहे. पोलिसांनी दोन स्कॉर्पिओ गाड्यांमधून (Scorpio vehicles) तब्बल 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त (3 crore 50 lakh cash seized) केली आहे. या घटनेमुळे अमरावती (Amravati Crime) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही रक्कम हवालामार्फत (hawala racket) नेण्यात येत होती, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातून हवालामार्फत (hawala racket) मोठ्या रक्कमेची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी दोन स्कॉर्पिओ गाड्या अडवण्यात आल्या. यामधून तब्बल 3 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती अमरावती पोलिसांनी (Amravati police) दिली आहे.

अमरावती शहरातून हवालामार्फेत मोठ्या रक्कमेची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार फरशी स्टॉप परिसरात (farshi stop amravati) नाकाबंदी करण्यात आली. यावेळी दोन स्कॉर्पिओ गाड्यांना थांबवून तपासणी केली. त्यावेळी दोन्ही गाड्यांमध्ये मोठ्या
प्रमाणात रोकड आढळून आली. पोलिसांनी रोकडसह चार गुजराती नागरिकांना (Gujarat
citizens) ताब्यात घेतले आहे. पैसे ठेवण्यासाठी गाडीमध्ये विशिष्ट प्रकारची जागा तयार करण्यात
आली होती, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.

कोणाला संशय येऊ नये म्हणून गाडीतील सीटच्या खाली जागा करण्यात आली होती. यामध्ये 3
कोटी 50 लाखांची रोकड लपवून ठेवण्यात आली होती. एवढी मोठी रक्कम पाहून पोलीस देखील
चक्रावून गेले. नोटांची बंडल बाहेर काढण्यात आले. ही रक्कम मोजण्यासाठी दोन स्वयंचलित यंत्र
कार्यान्वित करण्यात आले. यासंदर्भात ट्रेझरी (Treasury) व इन्कम टॅक्स विभागाला (Income
Tax Department) याची माहिती देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्याच्या दरात 123 रुपयांची ‘घसरण’, चांदी झाली 206 रुपये ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

Modi Government | अधिकार्‍यांच्या कामाचा आढावा घेणार मोदी सरकार, 50 वर्षांवरील अकार्यक्षम ऑफिसरला करणार सेवानिवृत्त !

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Amravati Crime | 3 crore 50 lakh cash seized from 2 scorpio vehicles in amravati 4 gujarati citizens arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update