Amravati Crime News | 34 वर्षीय शिवसेना शहर प्रमुखाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सपासप वार; अवैध धंद्यातून खून झाल्याची चर्चा

अमरावती (Amravati Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – शिवसेना (Shivsena) शहर प्रमुख अमोल पाटील (Amol Patil) यांचा डोळ्यात मिरची पूड टाकून निघृण खून केला. ही घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर (Amravati-Nagpur National Highway) असलेल्या तिवसा (Tiwasa) शहरातील आशिर्वाद वाईन बारसमोर (Ashirvad Wine Bar) घडली. शनिवारी (दि.26) रात्री साडे दहाच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने अमोल पाटील (वय-34) यांच्यावर सपासप वार करुन खून (Murder) केला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. Amravati Crime News | amravati shiv sena city president amol patil brutally murdered on amravati nagpur national highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवसा शहरातील (Tiwasa City) आशिर्वाद वाईन बारमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास अमोल पाटील (Amol Patil) हे त्यांच्या मित्रासोबत बारमध्ये आला होता. परंतु बार (Bar) बंद झाल्याने अमोल पाटील व त्याचा एक मित्र बारसमोर बसले होते. बारसमोर दारू (Wine) पित असल्याची संधी साधून पाच जणांनी अमोलवर हल्ला केला. डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्याला जागीच ठार केले.

अवैध धंद्यातून खून
या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस स्टेशनचे (Tiwasa Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह (Dead body) शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवून दिली. या गुन्ह्यातील आरोपींचा (Accused) शोध घेऊन रात्री उशिरा चार जणांना अटक (Arrest) केली. तर एक आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धक्कादायक म्हणजे अमोल पाटील याच्यावर यापूर्वी दोन खूनाचा आरोप होता. त्याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (District Superintendent of Police) दोन वर्षासाठी तडीपारचा आदेश काढला होता. हा खून अवैध धंद्यातून झाला असल्याची चर्चा सध्या शहरामध्ये आहे.

Web Titel :- Amravati Crime News| amravati shiv sena city president amol patil brutally murdered on amravati nagpur national highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर