Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Amravati Crime News | हनुमान चालिसाचे पठण केल्याने चर्चेत आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी अमरावतीच्या (Amravati Crime News) पोलिस आयुक्त आरती सिंह (CP Aarti Singh) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उदयपूरच्या धर्तीवर अमरावतीत उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या (Murder) आयुक्तांच्या अपयशामुळे झाल्याचे पत्र राणा यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांना लिहिले आहे.

 

अमरावतीमध्ये मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची 21 जून 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. दरम्यान भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं समर्थन केल्याने कोल्हे यांची हत्या (Amravati Chemist Stabbed To Death) करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएकडे (NIA) वर्ग करण्यात आला असून, या तपासातून काय उघड होणार हे पहावे लागणार आहे. (Amravati Crime News)

नेमकं प्रकरण काय आहे?
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती. यावेळी अनेक राज्यात निदर्शनांना हिंसक वळणही लागले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी उदपूर (Udaypur) येथील टेलर व्यावयायिकाची त्याच्या दुकानात घुसून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अमरावती येथील मेडिकल व्यावयायिक असणाऱ्या उमेश कोल्हे यांची 21 जूनच्या रात्री हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर भाजपने ही हत्या शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच झाल्याचा आरोप केला होता. यामुळे जिल्ह्यात गदारोळ माजला आहे.

 

Web Title :- Amravati Crime News | mp navneet rana demands removal of amravati police commissioner aarti singh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Ashish Shelar | CM एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात आशिष शेलार यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या प्रकरण

 

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम