Amravati Crime | तरुणीला ‘न्यूड’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केली शरीर संबंधाची मागणी, महिला आयोगाने घेतली दखल (व्हिडिओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Amravati Crime | अमरावतीमध्ये एका अभियांत्रीकीचे शिक्षण (Engineering) घेणाऱ्या विद्यार्थीनीला न्यूड फोटो व्हायरल (Nude photo Viral) करण्याची धमकी (Threat) देत शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला या प्रकराची माहिती देऊन पोलीस ठाण्यात (Amravati Crime) फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणावर तपास करुन धमकी देणाऱ्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंट ब्लॉक केलं. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने (State Commission for Women) घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याशी संवाद साधून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 

रुपाली चाकणकर म्हणाल्या, अमरावतीमधील घटना दुर्दैवी आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सुचना सायबर क्राईमला (Cyber Crime) देण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर क्राईमच्या घटनांबाबत शासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. (Amravati Crime)

 

दोन वर्षात ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळेही सायबर गुन्हेगारी वाढत आहे. याबाबत विद्यार्थीनींमध्ये ही जनजागृती होणं गरजेचं आहे.
त्यांना मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. यासाठी शिक्षण संस्था आणि शासन यांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे.
याबाबतही राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य सरकारला (State Government) शिफारस पाठवली आहे.
अशी माहिती चाकणकर यांनी दिली.

 

त्या पुढे म्हणाल्या, या घटनेत पुढे येऊन तक्रार नोंदवणाऱ्या विद्यार्थीनीचे मनापासून कौतुक करते.
कारण बऱ्याचवेळा अशा घटना घडल्यावर बदनामी होण्याच्या भीतीने किंवा कारवाई होईल की नाही
या भीतीपोटी अनेक मुली तक्रार करत नाहीत.
त्यांना मला आवर्जून सांगायचे आहे की, कोणतीही शेरेबाजी होत असेल, कोणीही असा त्रास देत असेल,
छेडछाड करत असेल, तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात याची नोंद करा.

 

Web Title :- Amravati Crime | rupali chakankar comment on amravati engineering student abuse on instagram

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम

Pune News | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच!; भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती