Amravati Crime | ‘चॉकलेट डे’ला तिनं नाकरलं चॉकलेट, ‘प्रॉमिस डेला’ तो पोहोचला ‘जेल’मध्ये

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Amravati Crime | व्हॅलेंटाईन डे च्या आगोदर व्हॅलेटाईन डे विक (Valentine’s Day Week) साजरा केला जातो. आपले एखाद्याच्या प्रति असलेले प्रेम व्यक्त करण्याचा हा आठवडा असतो. मात्र अमरावतीमध्ये (Amravati Crime) एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. ‘चॉकलेट डे’ला (Chocolate Day) तिनं चॉकलेट नाकरल्यामुळे तरुणाने मारहाण (Beating) केली. हा प्रकार चॉकलेट डे या दिवशी म्हणजे 9 फेब्रुवारीला अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात (Achalpur) घडला. याप्रकरणी तरुणीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ‘प्रॉमिस डेला’ (Promise Day) म्हणजेच 11 फेब्रुवारीला पोलिसांनी तरुणाला बेड्या (Arrest) ठोकल्या. आरोपीने एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिला प्रेमाचे चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला होता.

 

दिपेश हिरालाल नेतनराव Dipesh Hiralal Netanrao (वय-21 रा. बोर्डी, ता. अचलपूर) याच्याविरुद्ध शुक्रवारी (दि.11) विनयभंगाच्या (Molestation) कलमांन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पीडीत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती मागील वर्षी दहावी उत्तीर्ण झाली. आरोपीने तिला गाठत अकरावीत प्रवेश मिळवून देण्याची बतावणी केली. त्यामुळे दोघांमध्ये मोबाईल संवाद झाला. प्रवेशासाठी त्याने तिची दहावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (School Leaving Certificate), आधार कार्ड (Aadhar Card) घेतले. मात्र त्यानंतर त्याचे वागणे बदलले. तो प्रेम (Love) आणि लग्नाच्या (Marriage) बाता मारु लागला. तुझ्यावर प्रेम करतो, माझ्यासोबत लग्न कर असा तगादा त्याने लावला. त्याने पाठलाग केल्याचे देखील तक्रारीत नमूद केले. एवढेच नाहीतर शहराबाहेर गेल्यानंतर देखील तो पाठलाग करत होता. त्याने शारीरिक संबंध ठेवण्यास देखील प्रवृत्त व दबाव टाकत होता, असे तक्रारीत म्हटले आहे.

पीडीत मुलीने तक्रारीत असेही म्हटले की, 9 जुलै  2021 ते 9 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 8 वाजेच्यादरम्यान विविध प्रसंगांना आपण सामोरे गेल्याचे म्हटले.
शरिरसंबंधाला तिने नकार दिल्याने त्याने तिचा विनयभंग केला. 9 फेब्रुवारीला रात्री आठच्या सुमारास तिला मारहाण केली तसेच मारण्याची धमकी (Threat) दिली.
या सर्व प्रकारने हावलदिल झालेल्या पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर घरच्यांनी तिला बळ दिले.
अखेर 11 फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजता अचलपूर पोलीस ठाण्यात (Achalpur police station) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

Web Title :- Amravati Crime | she refused chocolate promise della he in police custody

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nandurbar LCB Police | वृद्धाला लुटणारा ‘पुष्पा’ अखेर गजाआड, नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

Pune NCP Prashant Jagtap | राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका; म्हणाले – ‘भाजपची वैचारिक दिवाळखोरी नागरिकांना पहायला मिळाली’

 

Multibagger Stocks | 10 हजारांचे झाले 36 लाख; दोन रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टाॅकने करून दिली कमाई, जाणून घ्या