अमरावतीच्या गुन्हेगाराकडून पुण्यातील तरूणीचे प्रेमप्रकरणातून अपहरण, ‘क्रिमीनल’ पोलिसांच्या ताब्यात पण मुलीचा शोध सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अमरावतीच्या गुन्हेगाराने पुण्यातील तरुणीचे प्रेम प्रकरणातून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या तरुणीचा अद्यापही शोध लागला नाही. पण तो गुन्हेगार दुसऱ्याच एका गुन्ह्यात अमरावती पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्या तरुणीचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांपुढे उभे टाकले आहे. शहरात ही तिसरी घटना असून, त्यादोनही प्रकरणात उघड काहीच करता आलेले नाही.

याप्रकरणी सागर गुंडव (रा. चांदुरबाजार, अमरावती) याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात भादवी कलम 364 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तरुणीच्या 24 वर्षीय भावाने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मूळची अमरावती जिल्ह्यातील आहे. आरोपी नी तिची महाविद्यालय जीवनापासून ओळख आहे. तर तिचे आणि आरोपीचे प्रेम संबंध होते. पण तिच्या कुटुंबाला या मुलाबाबत लग्न करण्यास विरोध होता. तरीही ते काही दिवस बोलत असे. दरम्यान तरुणीला आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी समजली. यामुळे तरुणीने त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ करत होती. तर लग्न करण्यास देखील तिने नकार दिला होता. तरुणी पुण्यात एकटीच राहत होती. यादरम्यान आरोपीने 13 मार्च रोजी तिला खोलीतून सोबत घेऊन गेला. हा प्रकार समोर आल्यानंतर भावाने पोलिसांकडे मिसिंग दाखल केली. तिचा शोध घेतला जात होता. पण ती सापडत नव्हती. दरम्यान नेमकं एका गुन्ह्यात अमरावती पालिसांनी आरोपीला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केली. त्यावेली तिच्याबाबत चौकशी करण्यात आली. पण थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आता पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत. अमरावती पोलिसांकडून त्याचा ताबा प्रथम मुंबई पोलीस घेणार असून, त्यानंतर आपण ताबा घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिम तपास चंदननगर पोलीस करत आहेत.