Amravati Graduate Election | अमरावती पदवीधर निवडणूकीत पाठिंबा देण्याची धमकी, अपक्ष उमेदवारावर प्राणघातक हल्ला

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – Amravati Graduate Election | अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. आता निवडणूक म्हंटले कि आरोप- प्रत्यारोप आलेच मात्र अमरावतीमध्ये याच निवडणुकीवरून अमरावती पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विकेश गोकुल गवाले (Vikesh Gokul Gawale) यांच्यावर हल्ला (Amravati Crime News) करण्यात आला आहे. सोमवारी प्रचारासाठी अमरावती येथील मोर्शीला जाताना माहुली जहागीरजवळ विकेश गोकुल गवाले यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विकेश गवाले किरकोळ जखमी झाले आहेत. (Amravati Graduate Election)

आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास विकेश गवाले हे आपल्या गाडीने मोर्शी येथे प्रचारासाठी जात होते. यावेळी त्यांना माहुली जहागीरपुढे रेल्वे पुलाजवळ चार अज्ञात इसमांनी हात दाखवून थांबवले. यावेळी विकेश गवाले यांच्यात आणि त्या अज्ञात लोकांमध्ये पाठिंबा देण्यावरून वाद झाला. याचवादातून एकाने विकेश गवाले यांना मारहाण (Beating) करायला सुरुवात केली. यानंतर गवाले यांनी तातडीने वाहन सुरू करून घटनास्थळावरून पळ काढून आपला जीव वाचवला. (Amravati Graduate Election)

माहुलीच्या बस स्टँडवर येताच त्यांनी त्या ठिकाणच्या नागरिकांना घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला.
यानंतर नागरिकांनी त्यांना तातडीने माहुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
माहुली येथील आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात
दाखल करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकाराची माहिती माहुली जहागीर पोलिसांना देण्यात आली आहे.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कोण आहेत विकेश गवाले?

विकेश गवाले हे अमरावती येथील खासगी बँकेत नोकरीला आहेत. रहाटगाव येथील वृंदावन अपार्टमेंट येथे ते वास्तव्यास आहेत. अमरावती पदवीधर निवडणुकीमध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

Web Title :- Amravati Graduate Election | amravati graduate constituency election independent candidate vikesh gawale attacked

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane | वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीवर नारायण राणे यांचा ‘प्रहार’; म्हणाले…

Pune Crime News | चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून 5 लाखांचा गंडा, 3 जणांविरुद्ध FIR; विमानतळ परिसरातील घटना

Diarrhea in Children | मुलांच्या डायरियाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या 5 लक्षणे आणि उपचार