महाराष्ट्रातील संतापजनक घटना ! ‘कोरोना’ टेस्टसाठी गेलेल्या तरूणीच्या ‘गुप्तांगा’तून घेतला स्वॅब

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावतीतील बडनेरा मध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करुन बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी येथील मॉल मध्ये काम करत असून, काही दिवसांपुवी मॉल मधील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना संसर्ग चाचणी केली होती. म्हणून ती चाचणीसाठी ती लॅब मध्ये गेली असता, आरोपी अशोक देशमुखने रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून युरीन तपासणी करावी लागेल असे, तरुणीला सांगितले.

दुसऱ्या दिवशी तरुणी आपल्या एका वरिष्ठ महिला सहकाऱ्यासह तिथे गेली. त्या दोघींनी महिला कर्मचारी नाहीत का? असे विचारले असता. आरोपीने महिला नसल्याचे सांगत तपासणी करता तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असे आरोपीने म्हटले. त्यानंतर त्याने स्वतः तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली. आणि तुमचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगितले.

दरम्यान, गुप्तांगाद्वारे करण्यात येणाऱ्या स्वॅब तपासणी बद्दल तरुणीला शंका आल्याने, तिने याबाबत आपल्या भावाला सांगितले. त्याने डॉक्टरांकडे चौकशी केली असता अशा प्रकारे चाचणी करत नसल्याचे म्हणाले. त्यानंतर तरुणीच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी अशोक देशमुख याला अटक केली असून, त्याच्यावर बलात्कारासह विविध कालमानांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.