माहेरी आल्यानंतर विवाहितेवर सलग 3 महिने लैंगिक अत्याचार, 9 वर्षांपुर्वी होते ‘मधूरसंबंध’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन –   चार महिन्यांपूर्वी माहेरी आलेल्या विवाहितेला पुन्हा प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सलग 3 महिने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमरावतीमधील गोयंकानगर परिसरात ही घटना घडली. नऊ वर्षांपूर्वी शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत पिडीत तरुणीचे प्रेमसंबध होते.

या प्रकरणी पिडित विवाहितेने दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दत्तापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 महिन्यापूर्वीच पीडिता ही अमरावतीमधील गोयंकानगर येथे आपल्या माहेरी आली होती. तिच्या पालकांच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणाशी 9 वर्षांपूर्वी तिचे प्रेमसंबंध होते. ती माहेरी आल्यानंतर तरुणाने पुन्हा तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. सलग 3 महिने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. लैंगिक शोषण केल्याची तक्रार तिने दत्तापूर पोलिसांत दिली. पीडितेच्या तक्रारीवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास दत्तापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत.