ट्रक चालकाने धडक दिल्यामुळे अमरावतीच्या महापौरांच्या गाडीला अपघात

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अमरावती (Amravati) चे महापौर चेतन गावंडे यांच्या गाडीला काल रात्री साडेनउच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात महापौर चेतन गावंडे थोडक्यात बचावले आहेत. नागपूरवरून अमरावती (Amravati) च्या दिशेने जाणार्‍या मोठ्या ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे वाहनाचे किरकोळ नुकसान झाले असून अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

तिवसा शहरातील पेट्रोल पंप चौक परिसरात अपघात झाला आहे. काल रात्री साडेनउ वाजाता महापौर गावंडे नागपूरवरून अमरावती जात होते. त्यावेळी त्यांनी तिवसा शहराच्या पेट्रोल पंप चौकात शासकीय वाहन उभे केले होते. त्याचवेळी नागपूरवरून येणार्‍या एम एच 32 केयू. 5259 क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. यामध्ये महापौर गावंडे यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. ट्रक चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून महापौर यांच्यासह वाहन चालक सुखरूप आहे. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली होती.