Coronavirus : खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, नागपूरला हलवलं

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची बाधा झाली असून सर्वांवर उपचार सुरू आहे. मात्र, उपचारादरम्यान नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याचे वृत्त आहे.

कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर राणा यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या 6 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना नागपूरच्या ओखार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 6 ऑगस्टला राणा कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली होती. आमदार रवी राणा यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची लागण झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही केले होते.