Amravati-Nagpur National Highway | धावत्या ट्रॅव्हल बसवर सिनेस्टाईल गोळीबार, ४ प्रवाशी जखमी, महाराष्ट्रातील महामार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पोलीसनामा ऑनलाईन – Amravati-Nagpur National Highway | मध्यरात्री महामार्गावरून धावत असलेल्या ट्रॅव्हल बसवर बोलेरोतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांना गोळीबार केल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडली आहे. अमरावतीजवळ तिवसा येथे ही घटना घडली आहे. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान, सदर हल्लेखोर गोळीबार केल्यानंतर लुटमार न करता पळून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Amravati Bus Firing Case)

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ६ वर तिवसा जवळ रात्री उशिरा ही घटना घडली. ही खासगी प्रवासी बस नागपूरकडे निघाली होती. अचानक पाठीमागून आलेल्या बोलेरोतील हल्लेखोरांनी खासगी बसच्या ड्रायव्हरच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. यामध्ये चारजण जखमी झाले. हल्लेखोरांनी कोणत्या उद्देशाने गोळीबार केला हे अद्याप समजलेले नाही.(Amravati-Nagpur National Highway)

ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी पहाटेपर्यंत परिसरात नाकाबंदी केली. मात्र, हल्लेखोर सापडले नाहीत. गोळीबारातील जखमींना तिवसा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदार संघातील मविआचा उमेदवार ठरला, पण महायुतीत रस्सीखेच सुरूच

उमेदवारी मिळण्याची शक्यता संपली, वायकरांपाठोपाठ काँग्रेसचे निरुपम देखील शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

Pune News | महाराष्ट्र्र गुजराती समाज महामंडळाच्या महामंत्री पदी पुण्याचे राजेश शहा यांची फेरनिवड !

Sanjay Nirupam May Join Shivsena | उमेदवारी मिळण्याची शक्यता संपली, वायकरांपाठोपाठ काँग्रेसचे निरुपम देखील शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

Pune Hadapsar Crime | पुणे : डिलेव्हरी बॉयला लुटून परिसरातील वाहनांची तोडफोड, दहशत पसरवणाऱ्या चार जणांवर FIR (Video)