Amravati News । प्रेयसीला ज्या झाडाखाली भेटायचा, त्याच झाडाला प्रियकराने गळफास घेऊन केली आत्महत्या

अमरावती न्यूज (Amravati News) : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – Amravati News । प्रेयसीचा साखरपुडा झाल्याचा धक्का न पचवता आल्याने एका तरुणाने झाडाला गळफास घेवून आपला प्राण गमावला आहे. अनुभव धाकडे (वय, 33) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) रहाटगाव ठिकाणी घडली आहे. शेजारील एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध (Romance) होते. दोघेही रहाटगावनजीक असलेला शेतातील एका झाडाखाली भेटायचे त्याच झाडाला त्या तरुणाने गळफास घेतला.

अधिक माहितीनुसार, अनुभव धाकडे आणि तिची प्रेयसी हे दोघे लग्नही करणार होते. परंतु, मुलीच्या कुटुंबीयांचा या प्रेमसंबंधाला विरोध असल्यानं मुलीचा विवाह (Marriage) दुसरीकडे जमवला होता. तर, आपल्या प्रेयसीनी साखरपुडा केल्याची माहिती अनुभवला समजल्याने तो दु:खी झाला होता. त्यानंतर, ज्याठिकाणी झाडाखाली ते रोज भेटायचे त्याच ठिकाणच्या झाडाला अनुभवने गळफास घेतला. आत्महत्या (Suicide) करण्याआधी त्या तरुणाने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात आत्महत्येस प्रेयसी जबाबदार असल्याचं नमूद केलं आहे. तसेच आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे.

आत्महत्यापुर्वी अनुभवने लिहिलेल्या चिठ्ठीतील मजूकर –

‘त्या रात्री माझ्या घरचे झोपल्यानंतर तू मला येऊन भेटली. तेव्हा तू मला घट्ट मिठी मारून रडत होतीस. तेव्हा मी तुला सोडून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु तरीही तू समजत नव्हती. तुझा साखरपुडा होण्याआधी मी तुझ्या पप्पांना फोन करून सर्व सांगितले होते. परंतु, त्यांनी फाशी घ्यायची धमकी दिल्यामुळे तुझा विचार बदलला. माझ्यावर बलात्काराची केसही करणार होते. परंतु तू फक्त माझ्या पैशाचा आणि माझ्या मनाचा वापर केला. मला न्याय हवा. मला मुलीची बदनामी नाही करायची बस..!

हे देखील वाचा

Gopichand Padalkar | ‘रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात’, पडळकरांची शरद पवारांवर खोचक टीका (व्हिडिओ)

Chandrakant Patil । अजित पवार, अनिल परब यांची CBI चौकशी करा; चंद्रकांत पाटलांचं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Amravati News | lover took same tree under which he used meet his lover amravati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update