Amravati News | सेवानिवृत्त PSI ने मृत्यूपुर्वीच ठेवला चक्क 13 व्या चा कार्यक्रम; निमंत्रण पत्रिकाही वाटल्या अन्…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Amravati News | अमरावती जिल्ह्यातील एक अजब प्रकार समोर आला (Amravati News) आहे. अमरावती शहरातील राज्य राखीव पोलीस दलातील एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने (Retired PSI) मरणापूर्वी चक्क आपल्या तेरावीचा कार्यक्रम (Thirteenth Program Before Death) ठेवला आहे. अशा कार्यक्रमामुळे सध्या सर्वत्र जोरदार चर्चेला उधाण आलं आहे. मरणापूर्वी तेरावीचा कार्यक्रम ठेवल्याने जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी त्यांनी चक्क पत्रिका देखील छापल्या आहेत. त्या पत्रिका त्यांनी नातेवाईकांनाही पाठवल्या. सुखदेव दगडुजी डबरासे (Sukhdev Dagduji Dabrase) असं त्या सेवानिवृत्त पीएसआयचे नाव आहे.

सुखदेव डबरासे हे अमरावती येथील (Amravati News) नवीन आयटीआय कॉलनी रहाटगाव रोड परिसरात राहतात. त्यांचा एकुलता 1 मुलगा मुंबई येथे बॉक्सिंगचा कोच आहे. तर मुलगी पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू होणार आहे. प्रकृती ठणठणीत आहे. रोजचा व्यायामही सुरू आहे. पण आपल्या मरणानंतर होणारे आपले सत्कार सोहळे आपल्याला बघता येणार नाही. याच भावनेतून त्यांनी गेट-टुगेदर (Get-Together) म्हणून मरणापूर्वी तेरावीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

सुखदेव डबरासे (Sukhdev Dagduji Dabrase) यांनी आपल्या निमंत्रण पत्रातून सांगितलं आहे की, ‘आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे. कि मला सेवानिवृत्त होऊन 5 वर्षे 6 महिने होत असल्याने आणि मी सेवानिवृत्त होऊन पेन्शनचा आनंद घेत असल्यामुळे पुढील आयुष्य जगण्याची मनोइच्छा नसल्याने तसेच माझा मुलगा बाहेरगावी नोकरीला असल्याने माझे केव्हा मरण येईल याची शाश्वती नाही. हा कार्यक्रम स्वइच्छेने करीत आहे तरी या कार्यक्रमाला आपली इच्छाशक्ती दर्शवावी ही विनंती.’ ”आपला प्रार्थी सुखदेव डबरासे” असं त्यांनी उल्लेख केला आहे. दरम्यान या पत्राची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

Web Title : Amravati News | retired-Police Sub Inspector (PSI) put on 13th program before his death know the reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर