Amravati Police News | अमरावती पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, पोलीस शिपायाची विदेशात ‘फॉरेन डेप्युटेशन’वर प्रतिनियुक्ती

अमरावती न्यूज (Amravati News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police Force) सेवा देणारे अनेक अधिकारी (Officer) विदेशात (Abroad) जाऊन सेवा देतात हे आपण ऐकले आहे. परंतु एका पोलीस शिपायाला (Police constable) थेट विदेश सेवेत (foreign service) पाठवण्यात आल्याची घटना कदाचित पहिल्यांदाच घडत असेल. अमरावती ग्रामीण पोलीस दलातील (Amravati Rural Police Force) एका शिपायला (Police constable) विदेशात सेवा बजावण्याची संधी मिळाली आहे. विकास अंजिकर (Vikas Anjikar) असे या पोलीस शिपायाचे (Police constable) नाव आहे. विकास अंजिकर यांची विदेशात प्रतिनियुक्तीसाठी (Deputation) निवड करण्यात आली आहे. ( Amravati Police News | Police Constable from Amravati to go on Foreign Deputation)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

‘फॉरेन डेप्युटेशन’ (oreign deputation) वर प्रतिनियुक्ती

IAS, IFS दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी विदेशात पाठवण्यात येते.
परंतु अशाच प्रकारे सेवा देण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दलातील (Amravati Rural Police Force) पोलीस शिपाई विकास अंजिकर (Police constable Vikas Anjikar) यांना पाठवण्यात आल्याची माहिती अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. (Amravati Rural Superintendent of Police Dr. Hari Balaji N.) यांनी दिली आहे.
ज्या प्रमाणे अधिकाऱ्यांना विदेशात सेवा बजावण्यासाठी पाठवण्यात येते.
त्याच प्रमाणे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याला देखील विदेशात सेवा बजावण्यासाठी पाठवण्यात येते.
या योजनेंतर्गत विकास अंजिकर (Police constable Vikas Anjikar) यांना तीन वर्षासाठी ‘फॉरेन डेप्युटेशन’वर (foreign deputation) पाठवण्यात आले आहे.

 

अशी होते निवड

अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. (Amravati Rural Superintendent of Police Dr. Hari Balaji N.) यांनी सांगितले की, पोलीस दलातील पोलीस शिपायांना (Police constable) विदेशामध्ये सेवा (foreign service) देण्याची संधी मिळावी यासाठी ही योजना आहे.
आतापर्यंत सेवा बजावताना वरिष्ठांकडून मिळालेले शेरे, सेवा व कार्याची माहिती घेऊन शिपायांची या सेवेसाठी निवड केली जाते.
निवड झालेल्या शिपायाला दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाते (The constable is trained at a training center in Delhi).
त्यानंतर मुलाखत (Interview) घेऊन अंतिम निवड (Selection) केली जाते.
ही नियुक्ती (appointment) तीन वर्षांसाठी असते.
अमरावती ग्रामीण पोलीस (Amravati Rural Police) दलाचे शिपाई (Police constable) पुढील तीन वर्षे विदेशात जाऊन ‘सिक्युरिटी असिस्टंट’ (Security Assistant) म्हणून सेवा देणार आहेत.

 

ही खूप मोलाची गोष्ट आहे – अंजिकर

विदेशात सेवा बजावण्यासाठी निवड झाल्यानंतर विकास अंजिकर (Vikas Anjikar) यांनी सांगितले की, विदेशात जाऊन भारतमातेची प्रामाणिकपणे सेवा बजावण्याची संधी मला मिळाली आहे. ही खूप मोलाची गोष्ट आहे. याचे श्रेय ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन (Amravati Rural Superintendent of Police Dr. Hari Balaji N.) व माझे आई-वडील (Parents), पत्नी व कुटुंबीयांना आहे, अशी भावना अंजिकर यांनी व्यक्त केली.

 

यापूर्वी तीन शिपायांनी विदेशात सेवा बजावली

सायबर विभाग प्रमुख उपनिरीक्षक विरेंद्र चौबे (Cyber Department Chief Sub-Inspector Virendra Choubey) यांनी सांगितले, यापूर्वी अमरावती पोलीस दलातील (Amravati Police Force) तीन पोलीस शिपायांनी (Police constable) विदेशात सेवा (foreign service) बजावली आहे. यामध्ये अश्विन यादव (Ashwin Yadav), प्रविण वानखडे (Pravin Wankhade) आणि योगेश करडीकर (Yogesh Kardikar) यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa), म्यानमार (Myanmar) या सारख्या देशात जाऊन ग्रामीण पोलीस (Rural Police) दलातील कर्मचाऱ्यांनी आपली सेवा बजावली आहे. या कर्मचाऱ्यांनी विदेशात जाऊन आपली कार्यतत्परता दाखवून अमरावती जिल्ह्याच्या (Amravati district) शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Amravati Police News | amravati police constable from amravati to go on foreign deputation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO | आता ‘या’ कर्मचार्‍यांच्या टेक-होम सॅलरीत होणार वाढ, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळणार फायदा