Amravati Violence | अमरावतीमध्ये संचारबंदी लागू, पोलिसांकडून भाजपचा माजी मंत्री स्थानबध्द? (व्हिडीओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन –  त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या (Tripura violence) घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मुस्लिम समाजाच्या संघटनांनी (Muslim community organization) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (Agitation) केले. यानंतर अमरावती शहराच्या विविध भागात दगडफेक (Amravati Violence) झाली. त्यानंतर पुकारण्यात आलेल्या शहर बंदला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी शहरामध्ये संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच पुढील तीन दिवस इंटरनेट सेवा देखील बंद (Internet service off) करण्यात आली असून आज शहरात तणावपूर्ण शांतता पसरली (Amravati Violence) आहे. पोलिसांनी भाजपच्या माजी मंत्र्याला (BJP leader) शासकीय विश्रामगृहात स्थानबद्ध केल्याची माहिती आहे.

 

शुक्रवारी शहरातील काही भागात दगडफेक झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ भाजपने (BJP) रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवला.
राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून जोरदार निदर्शने केली.
शहरातील नमुना परिसर, जवाहर गेट, गांधी चौक भागामध्ये फिरुन किरकोळ स्वरुपात फुटपाथवर असलेल्या दुकानांची तोडफोड (Amravati Violence) करण्यात आली.
शहरातील संवेदनशील परिसर असलेल्या राजकमल चौक, नमुना, जवाहर गेट, जवाहर रोड या ठिकाणी असलेल्या प्रतिष्ठानात घुसण्याचा जमावाने प्रयत्न केला.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज (Lathi charge) केला. या बंदल हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी अमरावती शहरात संचारबंदी लागू केली.

भाजप माजी मंत्री स्थानबद्ध?

 

भाजपचे नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना अमरावती पोलिसांनी (Amravati police)
शासकीय विश्रामगृहात स्थानबद्ध (Located in Government Rest House) केले आहे.
भाजपने काल रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवला होता. यामध्ये अनिल बोंडे यांचा सक्रीय सहभाग होता.
त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘आज सर्व हिंदू रस्त्यावर उतरले तर पोलीस प्रशासन सरकार व नेत्यांच्या दबावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत’
असा आरोप करत घटनेचे काही व्हिडिओ शेअर (Video sharing) केले आहे.
त्यामुळे बोंडे यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Web Title : Amravati Violence | amravati violence bjp leader anil bonde detained by police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Habibganj Railway Station | मुंबई, दिल्ली, पुणे आणि बेंगळुरुला सुद्धा हबीबगंज स्टेशनने टाकले मागे, फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाहीत सुविधा

Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेतील प्रसिध्द ज्वेलर्सच्या दुकानातून 2.70 लाख रुपयांचे सोन्याचे गंठण महिलेने केले लंपास

Pune Crime | येरवड्यातील गणेशनगरमधील ज्येष्ठ महिलेस साडीचा मोह पडला महागात