Amravati Violence | ‘अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता, त्यामुळे विरोधी पक्षांनी…’ यशोमती ठाकूर यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर (Tripura Violence) अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Amravati Violence) घडून आला होता. अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचारात (Amravati Violence) अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (रविवार) अमरावतीतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) व पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेनंतर यशोमती ठाकूर यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

 

यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, अमरावती तणावासंदर्भात (Amravati Violence) दोन्हीकडच्या लोकांवर कारवाई होत आहे. अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी (Opposition) थोडा संयम बाळगायला हवा. आपल्याकडून शांततेचं आवाहन अपेक्षित असताना, वातावरण भडकवण्याचा प्रयत्न दिसत आहे.

 

 

तसेच 12 तारखेची घटना चुकीची होतीच त्याचं कोणीच समर्थन केलेले नाही.
तसेच 13 तारखेची घटना चुकीची होती, असं स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ही मान्य केलेले आहे.
या परिस्थितीत शासन योग्य कारवाई (Action) करत आहे.
महाराष्ट्रात शांतता राहावी म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असंही यशोमती ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Web Title :- Amravati Violence | amravati violence possibility of deteriorating environment due to incomplete information yashomati thakurs reply to devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा